IPHONE (फोटो सौजन्य . PINTEREST)
अमेरिका आणि चीनमध्ये सुरु असलेल्या टॅरिफ वॉरमुळ, अॅपल आपल्या आयफोनचे उत्पादन भारतात हलवण्याची योजना आखत आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, कंपनी तिच्या फोल्डेबल आयफोन आणि २० व्या एनिवर्सरी आयफोन मॉडेलसाठी चीनवर अवलंबून आहे. अॅपलचे हे दोन्ही मॉडेल ग्लास सेंट्रिक डिझाइनसह येणार आहेत.
Wi-Fi आणि इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT आणि Live TV, HMD करणार D2M टेकनॉलॉजिसह स्वस्त फोन लाँच
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनमधून होणाऱ्या आयातीवर १४५ टक्के कर लादला आहे. यासोबतच, अमेरिका भारतातील आयातीवर २६ टक्के कर लादत आहे. तर अॅपल भारतात आपले उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दुसरीकडे कंपनी तिच्या पहिल्या फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोनसाठी चीनवर अवलंबून आहे.
फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोन
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ग्लास सेंट्रिक डिझाइनमुळे अॅपल भारतात आपला पहिला फोल्डेबल आयफोन आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोन तयार करू शकणार नाही. कंपनीने चीनबाहेर कधीही नवीन डिझाइन तयार केलेले नाहीत. हा ट्रेंड अॅपलच्या आगामी फोल्डेबल आयफोन आणि २० व्या एनिवर्सरी एडिशन आयफोन मॉडेल्ससाठी देखील लागू असू शकतो. अॅपलचे आगामी डिव्हाइस २०२७ पर्यंत लाँच केले जाऊ शकतात.
अॅपल कंपनी अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या सर्व आयफोनचे उत्पादन भारतात हलवण्याचा विचार करत असल्याची बातमी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी २०२६ च्या अखेरीस अमेरिकेत विकले जाणारे ६ कोटी आयफोन भारतात तयार करेल. यासाठी कंपनीने भारतातील सरकारी संस्थांशीही बोलणे सुरू केले आहे. मात्र,अमेरिका आणि चीनमधील सुरू असलेल्या व्यापार चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.
फोल्डेबल आयफोनबाबत काय अपडेट आहे?
रिपोर्ट्सनुसार, अॅपलच्या फोल्डेबल आयफोनमध्ये ७.८ इंचाचा आतील डिस्प्ले आणि ५.५ इंचाचा बाह्य डिस्प्ले असेल. त्यात मेटॅलिक ग्लास हिंग मेकॅनिझम असेल, जो बुक स्टाईल डिझाइनसह येईल. या फोनमध्ये बाजूला माउंट केलेले टच आयडी बटण असेल. या फोल्डेबल फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. यासोबतच, फोल्डेड आणि अनफोल्ड दोन्ही डिस्प्लेमध्ये एकच फ्रंट कॅमेरा दिला जाईल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, अॅपलच्या पहिल्या फोल्डेबल आयफोनची किंमत $२,००० (सुमारे १.७ लाख रुपये) पासून सुरू होऊ शकते. ते २०२६ च्या अखेरीस लाँच होण्याची शक्यता आहे.
Vivo ने लाँच केला सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन, 6GB RAM सोबत मिळणार 5500mAhची बॅटरी