NOTHING (फोटो सौजन्य - PINTEREST)
भारतात CMF Phone 2 Pro स्मार्टफोन लाँच झाला आहे. नथिंगचा हा सब ब्रँड आहे. CMF चा हा फोन गेल्यावर्षी लाँच झालेल्या CMF Phone 1 ची जागा घेणार. कंपनीने अनेक अपग्रेडसह आपला नवीनतम स्मार्टफोन बाजारात आणला आहे. नथिंगच्या कॅमेरा सेटअपवर जास्त लक्ष केंद्रित केले गेले आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह बाजारात लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये टेलीफोटो लेन्सचा देखील समाविष्ठ आहे.
Foldable iPhone आणि २० वी एनिवर्सरी एडिशन आयफोनचा उत्पादन कुठे? भारत की चीन?
डिस्प्ले
स्मार्टफोनमध्ये 6.77 इंचाचा फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 480Hz आहे. या फोनचा डिस्प्ले पांडा ग्लास प्रोटेक्शन आणि HDR10+ स्पोर्टसह येतो.
प्रोसेसर आणि मेमरी
नथिंगचा हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 Pro चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8 GB रॅम आणि 128 GB आणि 256 GB स्टोरेजसह बाजारात लाँच करण्यात आला आहे.
कॅमेरा
या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे. त्यासोबत 50MPचा टेलीफोटो लेन्स आणि 8 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
बॅटरी
कंपनीने CMF Phone 2 Pro मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे. हा फोन 33 वॅट फास्ट चार्जिंग आणि 5W रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतो. भारतात, कंपनी या फोनसोबत चार्जर देखील देत आहे.
ऑपरेटिंग सिस्टम
नथिंगचा हा फोन Android 15 वर आधारित Nothing OS 3.2 कस्टम स्किनवर चालतो. कंपनीचे म्हणणे आहे की या फोनमध्ये 3 वर्षांसाठी ऑपरेटिंग सिस्टम अपडेट्स आणि 6 वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच अपडेट्स दिले जातील.
इतर वैशिष्ट्ये
CMF Phone 2 Pro स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, IP54 रेटिंग, 2 HD माइकसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच, या फोनमध्ये एक Essential Key बटण देण्यात आले आहे, ज्याद्वारे वापरकर्ते वेगवेगळे AI टूल्स सेट करू शकतात.
CMF Phone 2 Pro ची किंमत
CMF Phone 2 Pro हा 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेजसह 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. त्याचा दुसरा व्हेरिएंट देखील 8 GB रॅम आणि 256 GB सह 20,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा फोन पांढऱ्या, काळा, नारंगी आणि हलक्या हिरव्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे.
नथिंगचा हा फोन 5 मे पासून फ्लिपकार्ट, क्रोमा, विजय सेल्स आणि रिटेल स्टोअर्सवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. लाँच ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी CMF Phone 2 Pro वर 1000 रुपयांची सूट देत आहे.
Wi-Fi आणि इंटरनेटशिवाय पाहता येणार OTT आणि Live TV, HMD करणार D2M टेकनॉलॉजिसह स्वस्त फोन लाँच