Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

New UPI Rule: ट्रांजेक्शन फेल झाल्यास ताबडतोब मिळणार रिफंड, काय सांगतो UPI चा नवीन नियम? जाणून घ्या

UPI द्वारे पेमेंट करणे हे भारतातील लोकांच्या जीवनाचा एक भाग बनले आहे. आता UPI पेमेंटबद्दल एक बातमी आली आहे. आता जर व्यवहार अयशस्वी झाला तर तुम्हाला रिफंडसाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणार नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2025 | 12:55 PM
New UPI Rule: ट्रांजेक्शन फेल झाल्यास ताबडतोब मिळणार रिफंड, काय सांगतो UPI चा नवीन नियम? जाणून घ्या

New UPI Rule: ट्रांजेक्शन फेल झाल्यास ताबडतोब मिळणार रिफंड, काय सांगतो UPI चा नवीन नियम? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

डिजीटल पेमेंटने अर्ध जग व्यापलं आहे. किरकोळ भाजीवाल्यापासून ते अगदी 5 स्टार रेस्टॉरंटपर्यंत सर्वत्र यूपीआयची सेवा कार्यरत असते. देशाला डिजीटल इंडिया बनवण्यासाठी डिजिटल पेमेंटचा वाटा फार महत्त्वाचा आहे. खरं तर डिजीटल पेमेंटमुळे अनेकांचं जीवन अगदी सोपं झालं आहे. सुट्ट्या पैशांची कटकट आणि पैसे चोरीला जाण्याची टेंशन या सर्वांवरील उपाय म्हणजे डिजीटल पेमेंट. क्यूआर कोड स्कॅन करा, अमाऊंट टाका आणि पासवर्ड टाका आणि काही क्षणात समोरच्या व्यक्तिला पैसे ट्रांसफर होतात.

xAI लाँच करणार AI मॉडेल Grok 3, हे आहेत स्पेशल फीचर्स! काय म्हणाला Elon Musk, जाणून घ्या

मात्र काही वेळा नेटवर्क समस्येमुळे किंवा बँक सर्वर डाऊन असल्यास ऑनलाईन पेमेंटमध्ये समस्या निर्माण होतात. नेटवर्क समस्येमुळे किंवा बँक सर्वर डाऊन असल्यास पेमेंट अडकते किंवा दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकत नाही. आता अशा परिस्थितीत, लोकांना त्यांचे पैसे कुठे गेले किंवा त्यांना परतफेड कधी मिळेल याची चिंता वाटते. याबाबत आता एक नवीन UPI ​​नियम जारी करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

वास्तविक, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 फेब्रुवारी 2025 पासून UPI ​​व्यवहारांशी संबंधित नवीन नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. या बदलांमुळे चार्जबॅक (रिफंड प्रक्रिया) ऑटोमेटेड होईल, ज्यामुळे ग्राहकांना रिफंड जलद मिळण्यास मदत होईल आणि बँकांसाठी प्रक्रिया सोपी होईल.

नवीन UPI ​​नियम काय म्हणतो?

आतापर्यंत, जेव्हा एखादा व्यवहार फेल झाला तर तेव्हा बँक “T+0” (व्यवहाराच्या दिवसापासून) पासून चार्जबॅक प्रक्रिया सुरू केली जात होती. यामुळे, ज्या व्यक्तिच्या अकाऊंटमधून पैसे कट झाले आहेत, त्याला रिफंड मिळण्यासाठी काही वेळ लागत होता. तर अशा देखील अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये रिफंड नाकारला गेला आणि यासाठी आरबीआयने दंड देखील आकारला. मात्र आता असं होणार नाही.

Maha Kumbh Shield: BharatPe ने लाँच केली नवीन स्किम, महाकुंभात येणाऱ्या भाविकांचे UPI पेमेंट होणार सुरक्षित

आता “ट्रान्झॅक्शन क्रेडिट कन्फर्मेशन (TCC)” प्रणाली लागू केली जाईल जी स्वयंचलित पद्धतीने चार्जबॅक स्वीकारेल किंवा नाकारेल. यामुळे मॅन्युअल तपासणीची गरज दूर होईल आणि प्रक्रिया वेगवान होईल. एनपीसीआयच्या मते, हा नवीन नियम फक्त बल्क अपलोड आणि यूडीआयआर (युनिफाइड डिस्प्युट रिझोल्यूशन इंटरफेस) प्रकरणांमध्ये लागू होईल. तथापि, याचा परिणाम फ्रंट-एंडवर (ग्राहकांनी थेट केलेल्या तक्रारी) होणार नाही.

नवीन नियमांचा काय फायदा होईल?

  • चार्जबॅक प्रक्रिया स्वयंचलित असल्याने, ग्राहकांना लवकर रिफंड मिळेल.
  • बँकांना व्यवहारांच्या reconciliation साठी अधिक वेळ मिळेल.
  • फसवणूक आणि अनावश्यक वाद कमी करता येतील.
  • यामुळे आरबीआयचा दंड टाळण्यास मदत होईल.
  • संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होईल.

चार्जबॅक का होतात?

  • पूर्वी मंजूर केलेलं UPI ट्रांजेक्शन रिवर्स केलं जातं तेव्हा शुल्क चार्जबॅक होते. यामागे अनेक कारणे असू शकतात.
  • ग्राहकाने पेमेंट ओळखण्यास नकार दिला.
  • काही तांत्रिक बिघाडामुळे डुप्लिकेट पेमेंट करण्यात आले.
  • ग्राहकाने एखाद्या सेवेसाठी किंवा उत्पादनासाठी पैसे दिले परंतु त्याला योग्य डिलिव्हरी मिळाली नाही.
  • व्यवहार प्रक्रियेत तांत्रिक अडचणी होत्या.

Web Title: Now you will get instant refund if the transaction fails upi rollout new rules tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • online payment
  • Tech News
  • UPI payment

संबंधित बातम्या

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला
1

सर्वांचं घामटं काढायला बाजारात येतेय Samsung Galaxy S26 सिरीज, Launch Date आली समोर; उत्सुकता शिगेला

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्‍ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन
3

CES 2026: स्टाईल आणि टेक्नॉलॉजीचा परफेक्ट कॉम्बो! TCL ने केली कमाल, ईव्हेंटमध्ये सादर केला डिस्प्ले मोड बदलणारा स्मार्टफोन

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन
4

Free Fire Max: ‘HEARTROCKER’ रिंग इव्हेंटने जिंकली गेमर्सची मनं! प्रीमियम बंडलसोबत क्लेम करा एक्सक्लूसिव स्किन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.