
CES 2026: Samsung चा मोठा धमाका! अल्ट्रा-स्लिम प्रोफाइलसह Galaxy Book 6 सिरीज लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्समधील मोबाइल एक्स्पीरिअन्स (एमएक्स) बिझनेसचे अध्यक्ष, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आणि आरअँडडी ऑफिसचे प्रमुख वोन-जून चोई म्हणाले की, ”सॅमसंगमध्ये आमचा विश्वास आहे की, खरी नाविन्यता मुलभूत गोष्टी योग्य करण्यासह सुरू होते. गॅलेक्सी बुक६ सिरीजसह आम्ही विश्वासार्ह एआयच्या माध्यमातून अद्वितीय गती व क्षमतेला एकत्र केले आहे, ज्यामधून वापरकर्त्यांना सॅमसंगकडून अपेक्षित असलेली अपवादात्मक उत्पादकता व सर्जनशीलता क्षमता मिळतील.”
गॅलेक्सी बुक६ सिरीजमध्ये सॅमसंगची सर्वात प्रगत पीसी कार्यक्षमता आहे. अत्याधुनिक हार्डवेअरसह स्लिम व पोर्टेबल डिझाइनमध्ये हे डिव्हाईस सर्वोत्तम व्हिज्युअल्स व ऑडिओला सपोर्ट करतो. इंटेल® कोअर™ अल्ट्रा सिरीज ३ प्रोसेसर्सची शक्ती, इंटेल १८ए वर डिझाइन करण्यात आलेल्या पहिल्या क्लायण्ट सिस्टम-ऑन-चिप्स (एसओसी) यांसह गॅलेक्सी बुक६ कार्यक्षम, हाय-स्पीड सीपीयू, जीपीयू व एनपीयू१ कार्यक्षमता देते, ज्यामुळे अत्यंत गतीशील प्रोसेसिंग, विनासायास मल्टीटास्किंग आणि अधिक प्रतिसादात्मक एआयची खात्री मिळते.
हे तिन्ही लॅपटॉप मॉडेल्स कोर अल्ट्रा सीरीज 3 प्रोसेसरवर आधारित आहे आणि यामुळेच या मॉडेल्समध्ये आधीच्या डिव्हाईसच्या तुलनेत जास्त स्पीड आणि एफिशिएंसी पाहायला मिळत आहे. हे चिप इंटीग्रेटेड NPU सह जोडण्यात आले आहे. ज्या यूजर्सना जास्त ग्राफिक पावरची गरज असते त्यांच्यासाठी गॅलेक्सी बुक अल्ट्रा 6 ला NVIDIA GeForce RTX 5070 आणि 5060 लॅपटॉप GPU सह कॉन्फिगर करू शकतात. सॅमसंग गॅलेक्सी बुक 6 अल्ट्रा आणि प्रो मॉडल्स अपग्रेडेड डायनामिक AMOLED 2X डिस्प्लेसह उपलब्ध असणार आहेत आणि यामध्ये 30Hz पासून 120Hz पर्यंत एडेप्टिव रिफ्रेश रेट दिला आहे. ऑडिओसाठी सॅमसंग गॅलेक्सी बुक अल्ट्रा व्हेरिअंटमध्ये डॉल्बी एटमॉसलब सिक्स-स्पीकर सेटअप मिळणार आहे.
गॅलेक्सी बुक६ अल्ट्रा, गॅलेक्सी बुक६ प्रो आणि गॅलेक्सी बुक६ जानेवारी २०२६ च्या शेवटी निवडक बाजारपेठांमध्ये ग्रे किंवा सिल्व्हर रंगामध्ये उपलब्ध असतील. तसेच, गॅलेक्सी बुक६ एंटरप्राइज एडिशन देखील असेल, ज्यामध्ये व्यवस्थापित आयटी वातावरणासाठी सानुकूल केलेली वैशिष्ट्ये व सोल्यूशन्स असतील आणि हा डिवाईस एप्रिल २०२६ पासून विशिष्ट बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल.