Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

भारतात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असून आता UPI व्यवहार आणखी सोपे होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार, NPCI इंटरनेट कनेक्शनशिवाय NFC तंत्रज्ञानाच्या मदतीने UPI पेमेंट करण्यासाठी नवीन फीचर विकसित करत आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 26, 2026 | 11:49 AM
UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

UPI मध्ये मोठा बदल! आता इंटरनेटशिवायही करता येणार डिजिटल पेमेंट? जाणून घ्या कसं

Follow Us
Follow Us:
  • NPCI लवकरच NFC तंत्रज्ञानावर आधारित ऑफलाइन UPI पेमेंट फीचर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.
  • या सुविधेमुळे इंटरनेट नसतानाही NFC सपोर्ट असलेल्या PoS टर्मिनलवर ₹2,000 पर्यंतचे UPI पेमेंट करता येऊ शकते.
  • सध्या इंटरनेटशिवाय *99# आणि UPI 123Pay सारख्या सेवांद्वारेही UPI व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
भारतात डिजिटल पेमेंटची क्रेझ दिवसांदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अगदी साधी भाजी घेण्यापासून ते मॉलमध्ये जाऊन मोठी खरेदी करण्यापर्यंत सर्व ठिकाणी डिजिटल पेमेंट केला जातो. कारण कॅश बाळगणे, सुट्ट्या पैशांची कटकट या सगळ्यांपासून सुटका मिळते. तसेच डिजिटल पेमेंट्समध्ये रिवॉर्ड्स देखील जास्त मिळतात. याशिवाय सरकार भारतात डिजिटल पेमेंटवर अधिक भर देत असते. आता भारतात डिजिटल पेमेंट अधिक सोयीस्कर व्हावे या दिशेने एक मोठं पाऊल उचललं जाण्याची शक्यता आहे.

AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?

अलीकडेच काही रिपोर्ट समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये असा दावा केला जात आहे की, यूपीआय युजर्स आता लवकरच इंटरनेट कनेक्शनशिवाय देखील पेमेंट करू शकणार आहेत. रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCI एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने कोणत्याही दुसऱ्या डिवाइसवर किंवा कोणत्याही दुकानदाराच्या पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनलवर इंटरनेट शिवाय पेमेंट करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – AI Created)

कसं काम करणार हे नवं फीचर?

असं सांगितलं जात आहे की, हे नवीन सिस्टीम निअर फील्ड कम्युनिकेशन म्हणजेच NFC टेक्नोलॉजीवर आधारित असणार आहे. NFC एक शॉर्ट-रेंज वायरलेस टेक्नोलॉजी आहे, जी अत्यंत कमी अंतरावर वेगवान आणि सुरक्षित पद्धतीने डेटा ट्रान्सफर करू शकते. या पद्धतीने केल्या जाणाऱ्या ऑफलाईन यूपीआय ट्रांजेक्शनची मर्यादा दोन हजार रुपयांपर्यंत ठरवली जाऊ शकते.

ऑफलाइन पेमेंट करण्यासाठी पूर्ण करावी लागणार ही स्टेप

युजर्सना फीचर चा वापर करण्यासाठी सर्वात आधी इंटरनेटद्वारे यूपीआय लाईट डिजिटल वॉलेटमध्ये पैसे जोडावे लागणार आहेत. यानंतर जिथे इंटरनेट सर्विस उपलब्ध नसेल अशा ठिकाणी NFC सपोर्टवाल्या PoS टर्मिनलवर केवळ डिव्हाईस टॅप करून अगदी सहजपणे पेमेंट केले जाऊ शकते. विशेष म्हणजे या दरम्यान यूपीआय पिन इंटर करण्याची देखील कोणतीही आवश्यकता नसते. रिपोर्टमध्ये असं सांगितलं जात आहे की, या नवीन ‘ऑफलाइन यूपीआय’ (UPI) प्रणालीला आधार देता यावा यासाठी, देशात PoS उपकरणे तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रमाणित करण्याची प्रक्रिया NPCI या वर्षापासून सुरू करू शकते.

WhatsApp Update: व्हॉट्सॲप वापरण्याचा अनुभव बदलणार! iPhone यूजर्सना मिळणार नवं अपडेट, आता iMessage सारखा असणार चॅटचा लूक

इंटरनेट शिवाय यूपीआय पेमेंट करण्याची कॉन्सेप्ट काही नवीन नाही आताही तुम्ही *99# आणि UPI 123Pay सारख्या सर्विसचा वापर करून इंटरनेटशिवाय देखील पेमेंट करू शकणार आहात. 99# सर्विस USSD टेक्नोलॉजीवर आधारित आहे आणि कोणत्याही GSM फोनवर याचा वापर केला जाऊ शकतो. यामध्ये युजरला *99# डायल करून बँक निवडावी लागते. यानंतर सेंड मनी पर्यायाद्वारे यूपीआय आयडी किंवा मोबाईल नंबर एंटर करून पेमेंट केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने पेमेंट करताना एका वेळी जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत पैसे पाठवले जाऊ शकतात. दुसरीकडे UPI 123Pay विशेषतः फीचर फोन यूजर्ससाठी डिझाईन करण्यात आले आहे.

Web Title: Npci working on offline upi payments with nfc technology without internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • UPI payment

संबंधित बातम्या

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील
1

Apple Pay India Launch: iPhoneवर पेमेंटचा अनुभव बदलणार? Apple Payच्या भारतातील एन्ट्रीची चर्चा, ‘या’ बँकेसोबत डील

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
2

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
3

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
4

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.