AI इन्फ्लुएंसर्सची क्रेझ वाढली! Myntra आणि Lenskart ब्रँड्सची पहिली पसंती ठरले वर्चुअल स्टार्स, सोशल मीडियाचे जग बदलणार?
समोर आलेल्या एका रिपोर्ट नुसार, 2027 पर्यंत भारतात AI इन्फ्लुएंसर्स मानवी इन्फ्लुएंसर्सच्या बजेटचा 25 ते 35% भाग मिळवू शकतात. एआय इन्फ्लुएंसर्स तयार करण्यासाठी 2022 मध्ये तब्बल 3.6 करोड रुपयांचा खर्च येत होता. मात्र आता हे AI इन्फ्लुएंसर्स तयार करण्यासाठी केवळ 26 लाख रुपये खर्च केला जाऊ शकतो. भारतात हा ट्रेंड बऱ्याच प्रमाणात वाढला आहे. याचे कारण म्हणजे कायरा, माया आणि राधिका सुब्रह्मण्य सारख्या AI कॅरेक्टर्सने लाखों फॉलोअर्सचा टप्पा गाठला आहे. तसेच अनेक ब्रँड्स देखील यांच्यासोबत काम करतात. ज्यामध्ये लेन्सकार्ट, मिंत्रा आणि अजिओ सारख्या ब्रँडचा समावेश असल्याची सांगितले जात आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
भारतात कोरियन पॉप (K-pop) ची लोकप्रियता पाहता, लेंसकार्टने ‘Astro Iris’ नावाने AI K-pop बँड तयार केले आहे. यामध्ये चार डिजिटल मेंबर्स आहेत. प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. कंपनीने मिडजर्नी आणि रनवे सारख्या AI टूल्सचा वापर करून त्यांचे व्हिडिओ बनवले आहेत.
मिंत्राने माया नावाने एक वर्चुअल फॅशन इन्फ्लुएंसर बनवली आहे. ती 6000 हून जास्त ब्रँड्सचे प्रॉडक्ट सुचवते. तसेच ती 21 लाखांहून अधिक फॅशन कॉम्बिनेशनवर सल्ला देखील देऊ शकते.
या AI इन्फ्लुएंसरला भारतातील पहिली प्रसिद्ध AI इन्फ्लुएंसर मानले जात आहे. तीने नायका, प्युमा, बोट, रिअलमी आणि ॲमेझॉनसारख्या ब्रँड्ससोबत काम देखील केले आहे. तसेच ती शार्क टँक इंडियामध्ये देखील दिसली होती. इंस्टाग्रामवर तिचे 2.3 लाख फॉलोअर्स आहेत.
या डिजिटल कॅरेक्टरने ओप्पो आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या ब्रँड्ससाठी अनेक कॅम्पेन चालवले आहेत. ती फॅशन आणि लाईफस्टाइल संबंधित व्हिडिओ बनवते इंस्टाग्रामवर तिचे 3.7 लाख फॉलोवर्स आहेत.
ही भारताची पहिली मल्टीलिंगुअल AI इन्फ्लुएंसर आहे, जी ट्रॅव्हल्स संबंधित व्हिडिओ बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिने कॅम्पस फुटवेअर आणि सुपर यू सारख्या ब्रँडसोबत देखील काम केले आहे. ती तमिळपासून इंग्लिशपर्यंत सर्व भाषा बोलू शकते.
या AI इन्फ्लुएंसरने प्राडा, बीएमडब्ल्यू आणि सॅमसंग सारख्या ग्लोबल ब्रँड्स सोबत देखील काम केले आहे. इंस्टाग्रामवर तिचे 22 लाख फॉलोवर्स आहेत.
ही इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या वर्चुअल इन्फ्लुएंसर्सपैकी एक आहे. इंस्टाग्रामवर तिचे 93 लाख फॉलोवर्स आहेत. तिने सॅमसंग आणि आदिदास संख्या मोठ्या ब्रँड्ससाठी कॅम्पिंग चालवले आहेत.






