
Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Bank Strike: बँकेत काही महत्वाचं काम आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. जर तुमचं काम पेंडिंग असेल तर ते लगेच उरका, नाहीतर तुम्हाला मोठा त्रास होऊ शकतो. कारण सप्टेंबरच्या शेवटी बँका सलग 5 दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या संघटनेने, UFBU ने 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे बँकेचं काम पूर्णपणे ठप्प होणार आहे. आणि त्यात शनिवार-रविवारची सुट्टी पण आली आहे, त्यामुळे तर 5 दिवस बँकेत काहीच काम होणार नाही. SBI ने तर आपल्या ग्राहकांना आधीच सांगितलं आहे की तुमची कामं 26 सप्टेंबरच्या आधीच पूर्ण करून घ्या.
अनेकांना वाटेल 3 दिवसाचा संप आहे तर 5 दिवस बँका कशा बंद? तर त्याचं कारण असं आहे.
देशातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI ने सांगितलं आहे की आम्ही संपाच्या काळात सेवा चालू ठेवायचा पूर्ण प्रयत्न करू. पण जर जास्त कर्मचारी संपावर गेले तर शाखेतलं काम होणं कठीण आहे. खास करून चेक टाकणे, चेक क्लिअर होणे, नवीन कर्ज घेणे, कागदपत्रं तपासणे, DD काढणे यासारखी कामं ज्यासाठी बँकेच्या माणसाची गरज लागते, ती कामं अडकून पडतील. त्यांना उशीर होईल. त्यामुळे बँकेने सांगितलं आहे की 26 तारखेच्या आतच तुमची सगळी कामं उरकून घ्या. शेवटच्या क्षणाची वाट बघू नका. Bank Strike September 2026:
LPG Subsidy हवी असेल तर 1 ऑक्टोबरपूर्वी ‘हे’ काम उरका; नाहीतर होऊ शकते अडचण!
संपाची ही काही पहिली वेळ नाही. याआधी 11 सप्टेंबरला पण एक दिवसाचा संप झाला होता. आता 3 दिवसाचा संप होतोय. आणि UFBU ने इशारा दिला आहे की जर सरकारने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 26 ऑक्टोबर 2026 पासून आम्ही बेमुदत संप करू. म्हणजे बँका किती दिवस बंद राहतील याचा काहीच नेम नाही. त्यामुळे सप्टेंबर शेवटच्या या 5 दिवसात तुमची आर्थिक अडचण होऊ नये म्हणून आताच तयारी करा. लागणारी कॅश काढून ठेवा आणि शक्यतोवर डिजिटल पेमेंट वापरा.