
8000mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा... नव्या Oneplus स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
वनप्लस एन 6 दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर डिव्हाईसच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 24,999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोनची विक्री ॲमेझॉनवर 4 जुलैपासून सुरु होणार आहे. ग्राहक हा स्मार्टफोन फ्रेश मिंट आणि मिडनाईट ग्रीन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. ॲमेझॉन प्राईम डे सेल दरम्यान कंपनी स्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे एक्सक्लूसिव डिस्काऊंट ऑफर करणार आहे. यासोबतच ॲक्सिस बँक आणि एसबीआय क्रेडिट कार्ड्सचा वापर करून केलेल्या पेमेंटवर 2,000 रुपयांपर्यंतचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. 6 महिन्यांचा ‘नो-कॉस्ट ईएमआय’ पर्यायही उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य: OnePlus)
वनप्लसच्या N सीरीजमधील हा स्मार्टफोन डुअल सिम हँडसेट आहे, जो लेटेस्ट अँड्रॉईड 16 वर आधारित ऑक्सिजनओएस 16 वर चालते. वनप्लसचं असं म्हणणं आहे की, या फोनला दोन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि तीन वर्षांपर्यंत सुरक्षा अपडेट्स मिळणार आहे. वनप्लस एन 6 स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच एचडी एलसीडी टचस्क्रीन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,200 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन IP65 रेटिंग आणि मिलिट्री ग्रेड ड्यूरेबिलिटी सर्टिफिकेशनसह लाँच केला आहे.
नव्या वनप्लस स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6360 एपेक्स चिपसेट दिले आहे. या स्मार्टफोनने आतुतु बेंचमार्कमध्ये 6,15,800 पॉइंट्स मिळवले आहेत. थर्मल मॅनेजमेंटसाठी वनप्लस एन 6 मध्ये वेपर चेंबर कूलिंग सॉल्यूशन दिले आहे. यामध्ये 5,300 चौरस मिमीचे उष्णता उत्सर्जन क्षेत्र आहे.
कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये f/1.8 अपर्चर, 10x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला आहे. वनप्लस एन सीरीजचा हा फोन 1080p/60 fps वर व्हिडीओ रेकॉर्ड करतो. यासोबतच, हा फोन ड्युअल व्ह्यु व्हिडीओ मोडला देखील सपोर्ट करतो.
वनप्लस एन 6 स्मार्टफोनमध्ये 8,000mAh बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 45W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 6.5W रिवर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दावा केला आहे की, हा स्मार्टफोन सिंगल चार्जवर तीन दिवसांची बॅटरी बॅकअप लाईफ ऑफर करतो.