Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord 6 Launch Date: वनप्लस एक नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या आगामी स्मार्टफोनची लाँच डेट कंपनीने घोषित केली आहे. वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनसाठी सर्वजण उत्सुक आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 24, 2026 | 10:59 PM
भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

भारतातील लाँचिंगसाठी OnePlus Nord 6 सज्ज! या दिवशी करणार तुफानी एंट्री, असे असतील फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • OnePlus Nord 6 ची दमदार एंट्री! 9000mAh बॅटरीसह भारतात या दिवशी होणार लॉन्च
  • वनप्लसचा नवा 5G स्मार्टफोन येतोय; Nord 6 मध्ये मिळणार 165FPS गेमिंगची ताकद
  • OnePlus Nord 6 लॉन्च डेट जाहीर! मोठी बॅटरी आणि फ्लॅगशिप चिपसेटने वाढली उत्सुकता
टेक कंपनी वनप्लस भारतात त्यांचा आणखी एक नवीन 5G स्मार्टफोन लाँच करण्याची प्लॅनिंग करत आहे. कंपनीचा हा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord 6 या नावाने लाँच केला जाणार आहे. कंपनीने त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर आगामी स्मार्टफोनचा टिझर शेअर करत लाँच डेटची देखील घोषणा केली आहे. तसेच या आगामी स्मार्टफोनचे काही फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

भारत सरकारचा मोठा निर्णय! Google आणि YouTube सोबत केली भागीदारी, 15000 क्रिएटर्सना देणार मोफत AI प्रशिक्षण

कधी लाँच होणार नवा स्मार्टफोन?

OnePlus Nord 6 स्मार्टफोन 7 एप्रिल रोजी संध्याकाळी 7 वाजता भारतात लाँच केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये आगामी स्मार्टफोनचे संपूर्ण फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स समोर येणार आहेत. असं सांगितलं जात आहे की, OnePlus Nord 6 स्मार्टफोनची किंमत 35,000 ते 40,000 रुपयांदरम्यान असणार आहे. या फोनमध्ये प्रोसेसिंग पावर, हाय-फ्रेमरेट गेमिंग आणि मोठी बॅटरी दिली जाणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Nord, but newer.
Fast in play. Cool all the way.#OnePlusNord6 April 7, 7PM IST
Stay tuned: https://t.co/zG8KkUqQ8f pic.twitter.com/KpJWbu4SF9 — OnePlus India (@OnePlus_IN) March 24, 2026

असे असू शकतात OnePlus Nord 6 चे फीचर्स

कंपनीच्या आगामी OnePlus Nord 6 मध्ये क्वालकॉम का पावरफुल स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट दिला जाणार आहे. 4nm मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसवर तयार करण्यात आलेला हा चिपसेट 1+3+4 कोर आर्किटेक्चरचा वापर करतो. यामध्ये 3.2GHz पर्यंत क्लॉक स्पीड दिली जाणार आहे. या डिव्हाईसमध्ये एक प्रायमरी Cortex-X5 कोर आणि यासोबतच अ‍ॅड्रेनो 835 जीपीयू दिला जाणार आहे.

कंपनीने दावा केला आहे की, वनप्लसचा आगामी Nord 6 त्याच्या कॅटेगिरीमधील पहिले असे डिव्हाईस असणार आहे, जे बीजीएमआय, कॉल ऑफ ड्यूटी मोबाईल आणि फ्री फायर मॅक्स सारख्या निवडक मोबाईल गेम्समध्ये सातत्याने 165 FPS गेमप्ले देऊ शकते. डिव्हाईसमध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे, ज्यामध्ये 1800 निट्सचा उच्च ब्राइटनेस मोड आणि 3600 निट्सची पीक एचडीआर ब्राइटनेस मिळणार आहे. फोनमध्ये चांगल्या दिशात्मक आवाजासाठी इन-बिल्ट Spatial Audio बूस्टर देखील दिला जाणार आहे. डिव्हाईसमध्ये Aqua Touch 2.0 फीचर देखील मिळणार आहे, यामुळे डिस्प्ले किंवा यूजरची बोटे ओली असतानाही स्क्रीनचा प्रतिसाद कायम राखण्यास मदत होईल.

BSNL Recharge Plan: किंमत कमी अन् फायदे जास्त! हा आहे कंपनीचा 72 दिवसांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन, डेली 2.5GB डेटासह मिळणार हे फायदे

कंपनीच्या आगामी स्मार्टफोनमध्ये 9000 mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी सिलिकॉन-कार्बन टेक्नोलॉजीचा वापर करते. कंपनीचा दावा आहे की, सामान्य वापरात एकदा चार्ज केल्यावर बॅटरी अडीच दिवसांपर्यंत टिकू शकते. तसेच बॅटरी 26.9 तासांपर्यंत यूट्यूब स्ट्रीमिंग किंवा 60 एफपीएसवर 6.3 तासांपर्यंत 4 के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकते. हे डिव्हाइस 80 वॅट सुपरव्हूक वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते असं देखील सांगितलं जात आहे.

Web Title: Oneplus nord 6 is ready for india launching company shared post on social media tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 10:59 PM

Topics:  

  • oneplus
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral
1

यमराजांचा मेव्हणा जणू…! जीव धोक्यात घालून चिमुकला स्मार्टफोनमध्ये गुंग, पाहून यूजर्स झाले हैराण; Video Viral

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार
2

टायपिंगची गरज संपली! गुगल क्रोममध्ये येतंय ‘Select From Screen’ AI फीचर… यूजर्सचा अनुभव होणार आणखी मजेदार

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे
3

ग्राहकांच्या खिशाला बसणार फटका! ‘हे’ लोकप्रिय OPPO स्मार्टफोन झाले महाग; खरेदीसाठी मोजावे लागणार तब्बल इतके पैसे

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?
4

WhatsApp Update: स्कॅमर्सची खैर नाही! अनोळखी नंबरवरून मेसेज येताच यूजर्सना मिळणार इशारा; कसं काम करणार नवं फीचर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.