OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स
कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये चॅटजीपीटी फॉर टिन्सची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, चॅटजीपीटी फॉर टिन्स रेगुलर चॅटबॉटसोबत एक्स्ट्रा सेफ्टी फीचर्स आणि लर्निंग टूल्सना एकत्र करणार आहे. 18 ऑगस्टपासून या फीचरचे ग्लोबल रोलआउट सुरु झाले आहे, जे फ्री आणि पेड पर्सनल प्लॅन असलेल्या पात्र टीन अकाउंट्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ओपनएआय त्यांच्या एज-डिटेक्शन सिस्टिमच्या मदतीने ठरवणार आहे की, अकाऊंट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजरचे आहे की, नाही. 13 ते 17 वर्षे वयाचे यूजर्स ‘टीन एक्सपीरियन्स’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वत:चे वय नोंदवू शकणार आहेत. कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर रोलआऊट करत आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला हे फीचर अकाऊंटमध्ये दिसत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. येत्या काही आठवड्यांत तुम्ही या फीचरचा अनुभव घेऊ शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
लर्निंग फीचर्समध्ये स्टडी मोडचा समावेश करण्यात आला आहे. जो मुलांना थेट उत्तर देण्याऐवजी प्रश्न, हिंट्स आणि स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा यूजर्स अभ्यास करण्यासाठी मदत मागतील तेव्हा चॅटजीपीटी स्वत: त्यांना स्टडी मोड वापरण्याचा सल्ला देणार आहे. तसेच, कोडी आणि दुसऱ्या टूल्सच्या मदतीने यूजर्स त्यांचा सराव आणि समज तपासू शकतात.
स्टडी अवर्स फीचरच्या मदतीने निवडलेल्या वेळी नवीन चॅट्ससाठी ‘स्टडी मोड’ डीफॉल्ट म्हणून सेट करण्याची परवानगी देते. मुलं स्वत: ही वेळी सेट करू शकतात किंवा त्यांचे संबंधित पालक किंवा पालकत्व सांभाळणारे व्यक्ती देखील त्या सेट करू शकतात. क्वाइट अवर्स फीचर ठरावीक वेळी चॅटजीपीटीचा वापर ब्लॉक किंवा मर्यादित करू शकतो.
‘द टीन एक्सपीरियन्स’मध्ये सेल्फ-हार्म, वायलेंस, ईटिंग डिसऑर्डर, धोकादायक ॲक्टिविटीज आणि एडल्ट किंवा ग्राफिक कंटेंटबाबत अतिशय कठोर सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. एका दिर्घ सेशनदरम्यान चॅटजीपीटी यूजर्सना ब्रेक घेण्याचा सल्ला देऊ शकतो आणि हे केवळ एक एआय टूल असल्याची आठवण करून देऊ शकतो. ईमेज अपलोड करण्यापूर्वी हे टूल मुलांना संवेदनशील माहिती शोधण्याची वॉर्निंग देखील देऊ शकतो.
सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
पालक काही ठरावीक सेटिंग्ज मॅनेज करण्यासाठी पॅरेंटल कंट्रोल्सद्वारे त्यांचे अकाऊंट्स लिंक करू शकतात. ते स्टडी अवर्स आणि क्वाइट अवर्सचा वापर करू शकतात, मात्र मुलांचे वैयक्तिक चॅट्स वाचू किंवा मॉनिटर करू शकत नाहीत. काही गंभीर घटनांमध्ये ओपनएआय लिंक करण्यात आलेल्या पालकांच्या अकाऊंट्सना मुलांच्या मदतीसाठी गरजेच्या असलेल्या माहितीसह सेफ्टी अलर्ट पाठवणार आहे.






