संग्रहित फोटो
गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दसरा मैदान परिसरात काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत एकत्र जमले आहेत. माहिती मिळताच पोलिस पथकाने रवीनगर रोडवरील दसरा मैदान परिसर गाठून पाहणी केली. त्यावेळी काही जण अंधारात झाडाझुडपांच्या आडोशाला संशयास्पदरीत्या बसल्याचे दिसून आले. ते दरोड्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करून सातही जणांना ताब्यात घेतले.
दरोड्याचे साहित्य जप्त
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून मिरची पावडरचे पॅकेट, लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड, लाकडी लाठी, चाकू, मोबाइल, दोरी तसेच वाहन आदी साहित्य जप्त करण्यात आले. या साहित्याच्या आधारे आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सागर धोटे, रोहित जाजळे, सोहळ पचककार, कार्तिक ठोके, समर्थ कळकटकर, प्रतीक कुशराम आणि सुदर्शन वानखेडे यांचा समावेश आहे. या प्रकरणी राजापेठ पोलिस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलिस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त यशवंत सोळंके, पोलिस उपायुक्त शाम घुगे, पोलिस उपायुक्त प्रांजली सोनवणे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) नीलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
Ans: गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना ताब्यात घेतले.
Ans: पोलिसांनी वाहन आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांसह एकूण ३ लाख २६ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Ans: मिरची पावडर, लोखंडी टॉमी, लोखंडी रॉड, लाकडी लाठी, चाकू, मोबाइल, दोरी आणि वाहन आदी साहित्य जप्त करण्यात आले.






