Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

ChatGPT for Teens: ओपनएआयने 18 वर्षांखालील यूजर्ससाठी चॅटजीपीटी मध्ये खास सेफ्टी आणि लर्निंग फीचर्स आणले आहेत. ‘चॅटजीपीटी फॉर टिन्स’च्या माध्यमातून किशोरवयीन मुलांना अधिक सुरक्षित आणि अभ्यासासाठी उपयुक्त एआय अनुभव मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 19, 2026 | 12:23 PM
OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • चॅटजीपीटी फॉर टिन्समध्ये स्टडी मोड, स्टडी अवर्स आणि क्वाइट अवर्ससारखे खास लर्निंग व सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.
  • 13 ते 17 वर्षांच्या यूजर्ससाठी सेल्फ-हार्म, हिंसा, धोकादायक ॲक्टिव्हिटीज आणि एडल्ट कंटेंटपासून संरक्षणासाठी अतिरिक्त सेफगार्ड्स लागू केले आहेत.
  • पालकांना पॅरेंटल कंट्रोल्सद्वारे स्टडी आणि क्वाइट अवर्स मॅनेज करता येतील, मात्र ते मुलांचे वैयक्तिक चॅट्स वाचू शकणार नाहीत.
ओपनएआयने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नवीन सेफ्टी आणि लर्निंग फीचर लाँच केले आहे. यामुळे किशोरवयीन मुलांना चॅटजीपीटी वापरण्याचा एक खास अनुभव मिळणार आहे. हे नवीन फीचर कमी वयाच्या यूजर्सची एआय चॅटबोट वापरण्याची पद्धत बदलणार आहे. यामध्ये सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी जास्तीचे सेफगार्ड्स आणि टूल्स जोडण्यात आले आहेत. यासोबतच, ओपनएआय पालकांना त्यांच्या मुलांच्या चॅटजीपीटीच्या वापराबाबत काही ऐच्छिक कंट्रोल्स देखील उपलब्ध करून देईल. कंपनीने लाँच केलेल्या चॅटजीपीटी फॉर टिन्सचे ग्लोबल रोलआउट सुरु केले आहे आणि येणाऱ्या आठवड्यात हे फीचर सर्व पात्र अकाऊंट्सवर दिसणार आहे.

अरे देवा! ‘या’ Samsung स्मार्टफोन्सच्या वाढल्या किंंमती, Xiaomi नेही ग्राहकांना दिला धक्का… बजेटवर होणार थेट परिणाम

चॅटजीपीटी फॉर टिन्स

कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये चॅटजीपीटी फॉर टिन्सची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितलं आहे की, चॅटजीपीटी फॉर टिन्स रेगुलर चॅटबॉटसोबत एक्स्ट्रा सेफ्टी फीचर्स आणि लर्निंग टूल्सना एकत्र करणार आहे. 18 ऑगस्टपासून या फीचरचे ग्लोबल रोलआउट सुरु झाले आहे, जे फ्री आणि पेड पर्सनल प्लॅन असलेल्या पात्र टीन अकाउंट्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. ओपनएआय त्यांच्या एज-डिटेक्शन सिस्टिमच्या मदतीने ठरवणार आहे की, अकाऊंट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूजरचे आहे की, नाही. 13 ते 17 वर्षे वयाचे यूजर्स ‘टीन एक्सपीरियन्स’मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी स्वत:चे वय नोंदवू शकणार आहेत. कंपनी टप्प्याटप्प्याने हे फीचर रोलआऊट करत आहे. त्यामुळे सध्या तुम्हाला हे फीचर अकाऊंटमध्ये दिसत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही. येत्या काही आठवड्यांत तुम्ही या फीचरचा अनुभव घेऊ शकता. (फोटो सौजन्य: Pinterest) 

स्टडी मोड

लर्निंग फीचर्समध्ये स्टडी मोडचा समावेश करण्यात आला आहे. जो मुलांना थेट उत्तर देण्याऐवजी प्रश्न, हिंट्स आणि स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे. जेव्हा यूजर्स अभ्यास करण्यासाठी मदत मागतील तेव्हा चॅटजीपीटी स्वत: त्यांना स्टडी मोड वापरण्याचा सल्ला देणार आहे. तसेच, कोडी आणि दुसऱ्या टूल्सच्या मदतीने यूजर्स त्यांचा सराव आणि समज तपासू शकतात.

स्टडी अवर्स फीचर

स्टडी अवर्स फीचरच्या मदतीने निवडलेल्या वेळी नवीन चॅट्ससाठी ‘स्टडी मोड’ डीफॉल्ट म्हणून सेट करण्याची परवानगी देते. मुलं स्वत: ही वेळी सेट करू शकतात किंवा त्यांचे संबंधित पालक किंवा पालकत्व सांभाळणारे व्यक्ती देखील त्या सेट करू शकतात. क्वाइट अवर्स फीचर ठरावीक वेळी चॅटजीपीटीचा वापर ब्लॉक किंवा मर्यादित करू शकतो.

द टीन एक्सपीरियन्स

‘द टीन एक्सपीरियन्स’मध्ये सेल्फ-हार्म, वायलेंस, ईटिंग डिसऑर्डर, धोकादायक ॲक्टिविटीज आणि एडल्ट किंवा ग्राफिक कंटेंटबाबत अतिशय कठोर सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. एका दिर्घ सेशनदरम्यान चॅटजीपीटी यूजर्सना ब्रेक घेण्याचा सल्ला देऊ शकतो आणि हे केवळ एक एआय टूल असल्याची आठवण करून देऊ शकतो. ईमेज अपलोड करण्यापूर्वी हे टूल मुलांना संवेदनशील माहिती शोधण्याची वॉर्निंग देखील देऊ शकतो.

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

सेफ्टी अलर्ट

पालक काही ठरावीक सेटिंग्ज मॅनेज करण्यासाठी पॅरेंटल कंट्रोल्सद्वारे त्यांचे अकाऊंट्स लिंक करू शकतात. ते स्टडी अवर्स आणि क्वाइट अवर्सचा वापर करू शकतात, मात्र मुलांचे वैयक्तिक चॅट्स वाचू किंवा मॉनिटर करू शकत नाहीत. काही गंभीर घटनांमध्ये ओपनएआय लिंक करण्यात आलेल्या पालकांच्या अकाऊंट्सना मुलांच्या मदतीसाठी गरजेच्या असलेल्या माहितीसह सेफ्टी अलर्ट पाठवणार आहे.

Web Title: Openai launched chatgpt for teens under 18 with new safety and learning features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 19, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • chatgpt
  • openai
  • Tech News

संबंधित बातम्या

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर
1

सरकारची सोशल मीडियावर नजर! पाच महिन्यांत तब्बल 1.95 लाख पोस्ट ब्लॉक करण्याचे आदेश, वाचा सविस्तर

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती
2

6,500mAh बॅटरी अन् 50MP कॅमेरा… Pova च्या नव्या स्मार्टफोनचा धमाका, जाणून घ्या फीचर्स आणि किंमती

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
3

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर
4

कधीपर्यंत लाँच होणार BSNL 5G? पुन्हा SIM बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड मिळणार? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.