
Flipkart पुन्हा करणार धमाका! 'या' दिवशी सुरु होतोय ब्लॅक फ्राइडे सेल... स्मार्टफोन्सवर मिळणार आकर्षक डील्स
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. हा सेल 27 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल किंवा तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी असणार आहे. सेलमध्ये कोणत्या स्मार्टफोन्सवर डिल्स मिळू शकतात, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Flipkart)
फ्लिपकार्ट सेलमध्ये प्रिमियम, बजेट आणि मिड-रेंज अशा तिन्ही सेगमेंटमधील स्मार्टफोन्सवर डिल्स उपलब्ध असणार आहेत. यामुळे स्मार्टफोन्स आणखी स्वस्त किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात. प्रिमियम सेगमेंटमध्ये गॅलेक्सी एस25, आयफोन 17, गॅलेक्सी एस25 एफई, गूगल पिक्सेल 11 आणि आयफोन 15 सारख्या स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. सेलमध्ये पिक्सेल 11 73,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध असू शकतो. तसेच, हा स्मार्टफोन दर महिना 6,166 रुपये ईएमआय भरून देखील खरेदी केला जाऊ शकतो. यासोबतच, पोको एक्स8 प्रो मॅक्सची किंमत सेलमध्ये 47,999 रुपये आणि मोटोरोला एज 70 प्रोची किंमत 36,999 रुपये असू शकते.
आगामी फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यान विवो टी5एक्स 5G ची किंमत 25,499 रुपये असू शकते. तर एज 70 फ्यूजन 32,999 रुपये आणि एआई प्लस नोवा 2 अल्ट्रा 5जी 20,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. विवो टी5 5G 30,999 रुपये आणि नथिंग फोन 4 ए 35,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो.
काय सांगता!!! Instagram स्टोरी अपलोड केल्यानंतरही मिळणार एडीट पर्याय… यूजर्ससाठी नवं फीचर रोलआऊट
सेलमध्ये बजेट स्मार्टफोनवर देखील आकर्षक डिल्स आणि ऑफर्स उपलब्ध असणार आहेत. सेलमध्ये Ai+ Nova 2 5G स्मार्टफोनची किंमत 13,999 रुपये असणार आहे. तर मिवी वन 5G 13,999 रुपये आणि Boltt Ace स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलदरम्यान एक्सिस बँक, फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड आणि एसबीआय फ्लिपकार्ट कार्डवर 5 टक्क्यांपर्यंत कॅशबॅक मिळणार आहे. यासोबतच ग्राहकांना एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआयसारख्या ऑफर्सचा फायदा देखील मिळणार आहे.
Ans: फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल 21 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून 27 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
Ans: या सेलमध्ये iPhone 17, iPhone 15, Samsung Galaxy S25, Galaxy S25 FE, Google Pixel 11 आणि Motorola Edge 70 Pro यांसारख्या स्मार्टफोनवर आकर्षक डील्स मिळणार आहेत.
Ans: या सेलमध्ये Google Pixel 11 हा स्मार्टफोन 73,999 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध होऊ शकतो.