प्रिमियम सेगमेंटमध्ये Oppo चा मास्टरस्ट्रोक! 200MP कॅमेऱ्यासह भारतात नव्या स्मार्टफोन सिरीजची एंट्री, किंमत लाखोंच्या घरात...
Sonia Gandhi चं इंस्टाग्रामवर पदार्पण; फॉलोइंग लिस्टमध्ये केवळ हे 3 अकाउंट्स, नावं वाचून व्हाल थक्क!
भारतात ओप्पो फाइंड X10 च्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,39,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,69,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स च्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 1,99,999 रुपये आहे. या डिव्हाईससोबत येणाऱ्या हॅसेलब्लॅड टेलिफोटो कन्व्हर्टर किटची किंमत 24,999 रुपये आहे. कंपनी एचडीएफसी फर्स्ट बँक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्डांवर 15 टक्के कॅशबॅकही देत आहे. (फोटो सौजन्य: Oppo)
नव्या स्मार्टफोन्सची विक्री ओप्पो ऑनलाईन स्टोअर, फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनद्वारे 29 सप्टेंबरपासून भारतात सुरु होणार आहे. ओप्पो फाइंड एक्स10 प्रो मॅक्स लुना व्हाइट आणि टायटॅनियम ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे, तर ओप्पो फाइंड एक्स10 ग्लेशियर ब्लू, ग्लो कोरल आणि मिस्ट ग्रे रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स एक डुअल-सिम हँडसेट आहे, जो ओप्पोच्या लेटेस्ट अँड्रॉईड 17-बेस्ड कलरओएस 17 वर चावतो. यामध्ये 6.78-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. स्क्रीनमध्ये एचबीएम मध्ये 2,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस, 450 पीपीआय पिक्सेल डेंसिटी, 1.07 बिलियन कलर्स, 1,000Hz इंस्टेंट टच सँपलिंग रेट आणि क्रिस्टल गार्ड कवर ग्लास प्रोटेक्शन मिळणार आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हे हँडसेट पाणी आणि धूळीपासून सुरक्षेसाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग्स ऑफर करते.
हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 Pro चिपसेटवर चालतो, जो 2nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे आणि 4.55GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये एआरएम माली जी2-अल्ट्रा जीपीयू, एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि यूएफएस 4.1 स्टोरेज देण्यात आले आहे. सुरक्षेसाठी या डिव्हाईसमध्ये अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स हा भारतातील पहिला असा स्मार्टफोन आहे, जो फ्लॅगशिप मीडियाटेक डायमेन्सिटी 9600 प्रो चिपसेटने सुसज्ज आहे.
नव्या स्मार्टफोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये Hasselblad-ट्यून्ड ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे. यामध्ये 1/1.3-इंच आयसोसेल एचपीसी सेंसर, 24mm फोकल लेंथ आणि ओआयएससह 200-मेगापिक्सेल (f/1.5) चा अल्ट्रा एचडीआर प्रायमरी शूटर मिळणार आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 13mm फोकल लेंथ आणि ऑटोफोकस वाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेन्सिंग अल्ट्रा-वाइड (f/2.2) कॅमेरा, आणि 1/1.56-इंच आयसोसेल एचपी5 सेंसर आणि ओआयएस सपोर्टवाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेन्सिंग टेलीफोटो (f/2.1) कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, हा देशातील पहिला असा स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये ट्रिपल 200-मेगापिक्सेल रियर कॅमेरा सिस्टिम देण्यात आली आहे.
सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 100-डिग्री फील्ड ऑफ व्यूसह 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा क्लिअर फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. हा फोन 8K/60 fps पर्यंक व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. अधिक चांगल्या लो-लाईट फोटोग्राफीसाठी डिव्हाईसमध्ये LUMO हायपर पिक्सेल, LUMO ट्रू इमेज इंजिन आणि डीपपिक्स सेंसर टेक्नोलॉजी दिली आहे.
फोनमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8,000mAh बॅटरी दिलीस आहे. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये 5G, 4G LTE, वायफाय 7, ब्लूटूथ 6.2, यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ग्लोनास, बीडीएस, गॅलिलिओ, क्यूझेडएसएस आणि NavIC सपोर्ट मिळणार आहे. सेंसर्सच्या यादीमध्ये प्रॉक्सिमिटी, एंबियंट लाइट, कलर टेम्परेचर, ई-कंपास, एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप, हॉल सेंसर, लेजर फोकसिंग सेंसर, स्पेक्ट्रल सेंसर आणि आयआर ब्लास्टर समाविश्ट आहे.
ओप्पो फाइंड X10 देखील एक डुअल-सिम डिव्हाईस आहे. यामध्ये प्रो मॅक्स मॉडेलवाले ऑपरेटिंग सिस्टिम, कनेक्टिविटी ऑप्शन्स, ऑनबोर्ड सेंसर्स, बॅटरी, चार्जिंग सपोर्ट आणि वॉटर प्रोटेक्शन रेटिंग्स मिळणार आहे. याचा डिस्प्ले 6.59-इंच फुल-एचडी+ (1,272 x 2,768 पिक्ससेल) अमोलेड आहे. इतर डिस्प्ले फीचर्स प्रो मॅक्ससारखेच आहेत. हे डिव्हाईस 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेल्या ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 9600M चिपसेटवर चालते.
फोटोग्राफीसाठी यामध्ये हॅसेलब्लॅड-ट्यून्ड रियर कॅमेरा सिस्टिम दिली आहे. यामध्ये 1/1.4-इंच आयसोसेल एचपीई सेंसर, 23mm फोकल लेंथ आणि ओआयएससह 200-मेगापिक्सेल (f/1.6) अल्ट्रा क्लिअर मेन कॅमेरा मिळणार आहे. यासोबतच या डिव्हाईसमध्ये ओआयएस सपोर्टवाला 200-मेगापिक्सेल अल्ट्रा-सेंसिंग टेलीफोटो (f/2.6) कॅमेरा आणि 15mm फोकल लेंथवाला 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाईड (f/2.0) कॅमेरा दिला आहे. पुढच्या बाजूला, यात ‘प्रो मॅक्स’ मॉडेलमध्ये असलेला 50 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे आणि हा फोन 8K/30 fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 (12GB + 256GB) ची किंमत ₹1,39,999 आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्स (12GB + 512GB) ची किंमत ₹1,99,999 आहे.
Ans: दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो फाइंड X10 प्रो मॅक्समध्ये MediaTek Dimensity 9600 Pro प्रोसेसर आहे.






