Oppo Find X9 वर जबरदस्त डील! फ्लिपकार्टवर मिळणार हजारो रुपयांचे डिस्काऊंट, जाणून घ्या स्मार्टफोनचे फीचर्स
विशेष म्हणजेच या स्मार्टफोनवर फ्लिपकार्ट विशेष डिल्स देत आहे. यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करू शकतात. फ्लिपकार्टवर उपलब्ध असलेल्या या डिलमुळे तुम्हाला कमी किंमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. लक्षाात ठेवा की, या ऑफर्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. त्यामुळे जर तुम्हाला या ऑफरअंतर्गत ओप्पो फाईंड एक्स 9 खरेदी करायचा असेल तर घाई करावी लागणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
ओप्पो फाईंड एक्स 9 ची अधिकृत किंमत भारतात 84,999 रुपये आहे. मात्र फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन सध्या 77,995 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 7,004 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे. ही किंमत फोनच्या 12G रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक आणि फ्लिपकार्ट एसबीआय कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना अधिक डिस्काऊंट मिळणार आहे.
तसेच, आयसीआयसीआय आणि ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत अधिक डिस्काऊंट मिळणार आहे. तसेच ग्राहक ईएमआय पर्यायाचा देखील वापर करू शकणार आहेत. अधिक बचत करण्यासाठी ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकतात.
ओप्पो फाईंड एक्स 9 मध्ये 1.5K रेजोल्यूशन (2760×1256), 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,600 निट्सच्या पीक ब्राइटनेसवाला 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 चे प्रोटेक्शन देखील मिळणार आहे. परफॉर्मंससाठी या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 चिपसेट देण्यात आला आहे. याशिवाय, या डिव्हाईसमध्ये 80W वायर्ड आणि 50W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 7,025mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन 10W रिवर्स चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
फोटोग्राफीसाठी ओप्पो फाईंड एक्स 9 मध्ये बॅक पॅनलवर हॅसेलब्लॅड ट्यून्ड 50MP चा ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये ओआयएस आणि f/1.6 अपर्चरसह 50MP चा मुख्य कॅमेरा (सोनी एलवायटी-808), f/2.0 अपर्चरवाला 50MP चा अल्ट्रा-वाईड (सॅमसंग जेएन5) आणि 3x ऑप्टिकल झूम आणि ओआयएस सपोर्टसह 50MP चा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस (सोनी एलवायटी-600) समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.






