स्टाईल आणि किंमतीचा परफेक्ट कॉम्बो! Oppo ने गुपचूप लाँच केला 6,500mAh बॅटरीवाला स्वस्त 5G फोन, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स वाचा
मिळालेल्या माहितीनुसार, ओप्पो कंपनीचा नवीन Oppo A6s 5G स्मार्टफोन दोन रॅम+ स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज या बेस व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपयांपासून सुरु होते आणि 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज या व्हेरिअंटची किंमत 20,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे डिव्हाईस ऑरोरा गोल्ड आणि प्लम पर्पल या रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. यास्मार्टफोनच्या खरेदीवर 1 हजार रुपयांचे इंस्टेंट कॅशबॅक देखील ऑफर केले जाणार आहे. कंपनी एसबीआय कार्ड्स, कोटक महिंद्रा बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, बीओबी कार्ड्स, येस बँक, फेडरल बँक, डीबीएस आणि इतर बँकांच्या क्रेडिट कार्डवर 3 महिन्यांची नो कॉस्ट ईएमआय सुविधा देखील देत आहे. हे नवीन डिव्हाइस ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडियाच्या वेबसाइटवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. (फोटो सौजन्य – Oppo )
ओप्पोने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Oppo A6s 5G मध्ये ColorOS 15 सह मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला व्हावा यासाठी या स्मार्टफोनमध्ये एआई गेमबूस्ट फीचर आणि हेवी टास्क कमी नेटवर्क असलेल्या ठिकाणी अधिक चांगली कनेक्टिविटी मिळावी, यासाठी AI LinkBoost 3.0 फीचर देखील देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी ओप्पोच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर आणि 2-मेगापिक्सेलचा कॅमेरा समाविष्ट आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ओप्पोच्या या डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. असा दावा करण्यात आला आहे की, बॅटरी एकूण 882.1 तासांपर्यंतचा स्टँडबाय टाईम मिळतो, तर व्हिडिओ प्लेबॅक टाईम 22.4 तासांपर्यंत असू शकतो.






