BGMI 4.3 Update: प्लेअर्ससाठी आनंदाची बातमी! भारतात रोलआऊट झाले नवे अपडेट, APK डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
BGMI 4.3 अपडेट रिलीजबद्दल बोलायंच झालं तर APK फाईल 19 मार्च 2026 रोजी सुमारे 12:30 वाजता रिलीज करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे अपडेट सर्वात आधी काही यूजर्ससाठी रोलआउट केले जाते, ज्यामुळे सर्वरवर लोड पडू नये. तर APK फाईल नंतर रिलीज केले जाते. ज्यामुळे डाउनलोडिंग आणि इंस्टॉलेशन प्रोसेस सर्व यूजर्ससाठी सुरक्षित आणि अगदी सोप्या पद्धतीने केली जाऊ शकते. या अपडेटमध्ये गेमची स्टेबिलिटी वाढवण्यासाठी काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला BGMI 4.3 चे APK डाऊनलोड करायचे असेल तर याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनच्या ब्राऊझरमध्ये BGMI ची अधिकृत वेबसाईट ओपन करा. इथे तुम्हाला APK डाऊनलोड करण्याच पर्याय मिळणार आहे. तुम्ही या पर्यायवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड करण्याची प्रोसेस सुरु होणार आहे. डाऊनलोड झाल्यानंतर फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन अननोन सोर्सेसमधून इंस्टॉलेशनला परवानगी द्यावी लागणार आहे. त्यानंतर डाऊनलोड करण्यात आलेली फाईल ओपन करून इंस्टॉल करा. इंस्टॉलेशननंतर गेम इंस्टॉल करा आणि अतिरिक्त गेम फाइल्स डाऊनलोड करा. तुमच्या डिव्हाईसच्या परफॉर्मंसच्या हिशोबाने फाइल्स डाऊनलोड करू शकता.
या अपडेटमध्ये नवीन फीचर्स जोडण्यात आले आहेत. जसे नवीन थीम ‘इव्हॉल्व्हिंग युनिव्हर्स’ मुळे प्लेअर्सचा अनुभव आणखी मजेदार होणार आहे. याशिवाय स्मार्ट नेटवर्क ऑप्टिमाइजेशनमुळे कनेक्शन मजबूत होणार आहे आणि लॅग देखील कमी होणार आहे. अपडेट इंस्टॉल करण्यापूर्वी लक्षात ठेवा की, तुमच्या डिव्हाईसमध्ये कमीत कमी 4GB फ्री स्पेस असणं गरेजचं आहे. इंस्टॉलेशनदरम्यान, अतिरिक्त स्पेस गरजेची असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेमचे APK नेहमी अधिकृत वेबसाइटवरूनच डाउनलोड करा. अनधिकृत स्त्रोतांवरून डाउनलोड केल्यास तुमचे खाते बॅन होऊ शकते आणि मालवेअरचा धोका वाढू शकतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की, अपडेट नेहमी अधिकृत वेबसाइटवरूनच डाउनलोड करा.






