स्मार्टफोन मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार Oppo Reno 14 5G चा नवीन कलर व्हेरिअंट, 50-मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह मिळणार पावरफुल बॅटरी
जुलै महिन्याच्या सुरुवातीला टेक कंपनी Oppo ने त्यांची नवीन स्मार्टफोन सिरीज Oppo Reno 14 5G लाँच केली आहे. या सिरीजमधील बेस व्हेरिअंट Oppo Reno 14 5G ला लोकांनी चांगली पसंती दर्शवली. कंपनीने लाँच केलेल्या स्मार्टफोन सिरीजमधील बेस मॉडेल Oppo Reno 14 5G मध्ये MediaTek Dimensity 8350 चिपसेट, 12GB पर्यंत रॅम आणि 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
कंपनीने हा स्मार्टफोन दोन कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. त्यानंतर आता कंपनीने हा स्मार्टफोन आणखी एका नव्या रंगात लाँच केला आहे. हा नवा रंग आकर्षक, कूल आणि एक स्टायलिश लूक देतो. म्हणजेच आता हा स्मार्टफोन तीन कलर व्हेरिअंटमध्ये उपलब्ध झाला आहे. कंपनीने Oppo Reno 14 5G स्मार्टफोन मिंट ग्रीन कलर या नव्या रंगात लाँच केला आहे. या नव्या कलर व्हेरिअंटची किंमत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Minted to stand out.
Meet the all-new OPPO Reno14 in Mint Green, where fresh hues meet flagship style.
New Shade of Cool#OPPOReno14Series #TravelWithReno #AIPortraitCamera pic.twitter.com/etwyecHsLH — OPPO India (@OPPOIndia) July 25, 2025
Oppo Reno 14 5G ची किंमत भारतात 8GB + 256GB व्हेरिअंटसाठी 37,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटसाठी 39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही स्टोरेज व्हेरिअंट मिंट ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. याबाबत माहिती देण्यासाठी कंपनीने प्रेस रिलीज जारी केले आहे. Reno 14 5G चा एक 12GB + 512GB व्हेरिअंट देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 42,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन Oppo India ची वेबसाइट, Amazon आणि देशभरातील रिटेल स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनचे फॉरेस्ट ग्रीन आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शन्स आधीपासूनच खरेदीसाठी उपलब्ध आहेत. आता हा स्मार्टफोन एका नव्या रंगात उपलब्ध झाला आहे.
Oppo Reno 14 5G मध्ये 6.59-इंच 1.5K OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 1,200 निट्स ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह येतो. हा फोन MediaTek Dimensity 8350 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. हँडसेट Android 15 बेस्ड ColorOS 15.0.2 वर चालतो. या डिव्हाईसमध्ये Google Gemini द्वारे जोडलले AI फीचर्स जसे की AI Unblur, AI Recompose, AI Call Assistant आणि AI Mind Space देखील मिळते.
फोटोग्राफीसाठी Oppo Reno 14 5G मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर, 50 मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा (3.5x ऑप्टिकल झूमसह) आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग देण्यात आलं आहे.
Oppo Reno 14 5G मध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये डुअल नॅनो-SIM सह eSIM सपोर्ट, 5G, 4G, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, GPS आणि USB Type-C यांचा समावेश आहे.