Google चं राज्य संपणार का? 10 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं... AI चॅटबोट ChatGPT ने लोकांना घातलीये भुरळ?
सर्च इंजिन गुगल की AI चॅटबोट ChatGPT, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमतं उत्तर काय असेल? 2020 पूर्वीच्या काळाचा विचार केला तर लोकं कोणतीही माहिती शोधण्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करत होते. छोट्याहून छोटा आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देखील गुगलवर सर्च केलं जात होते. मात्र 2020 नंतरच्या काळाचा विचार केला तर लोकं गुगलपेक्षा AI ला जास्त प्राधान्य देऊ लागली आहे. ज्यामुळे आता असं काहीतरी घडलं आहे, जे गेल्या 10 वर्षांत घडलं नव्हतं.
AI चॅटबोट ChatGPT गुगलला टक्कर देत आहे, त्यामुळे गुगलची दहशत कमी होताना पाहायला मिळत आहे. थर्ड ब्रिजच्या एनालिस्ट स्कॉट केसलरनुसार, गूगलचे ग्लोबल सर्च मार्केट शेयर 10 वर्षांत पहिल्यांदा 90 टक्क्यांनी खाली आलं आहे. याचं कारण OpenAI चे ChatGPT मानलं जात आहे. कारण पूर्वी ज्या प्रकारे लोकं गुगलचा वापर करत होते, त्याचप्रकारे आता OpenAI च्या ChatGPT चा वापर केला जात आहे. सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात लोक OpenAI च्या ChatGPT ला गुगलपेक्षा जास्त प्राधान्य देत आहे. म्हणजेच आता लोकं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगलकडे नाही तर OpenAI च्या ChatGPT कडे जात आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की, ChatGPT आता गुगलच्या दैनंदिन सर्च व्हॉल्यूमपैकी 15–20% हिस्सा हाताळत आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ChatGPT गुगलसाठी मायक्रोसॉफ्टच्या बिंगपेक्षा मोठा धोका बनत आहे. यामुळे अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की, येत्या काळात गुगलची दहशत कमी होऊ शकते आणि चॅटजीपीटीच्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.
ChatGPT ची अचूक आणि जाहिरातमुक्त माहिती लोकांना अधिक आकर्षित करत आहे. ऑफीसच्या कामापासून सुट्ट्यांचं प्लॅनिंग करण्यापर्यंत आणि शाळेच्या असाईंमेंटपासून गंभीर विषयांवर सल्ला घेण्यापर्यंत लोकं चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. एवढंच नाही तर चॅटजीपीटी त्यांच्या युजर्सना कोडिंग करण्यासाठी, कंटेंट तयार करण्यासाठी, फोटो आणि ग्राफिक तयार करण्यासाठी देखील मदत करते.
वाढत्या स्पर्धेचा विचार करता गुगलने ‘AI मोड’ नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. हे ‘AI मोड’ सर्च इंजनमध्ये चॅटबोटप्रमाणे कामं करते आणि सर्चबद्दल सविस्तर माहिती देते. गुगलच्या मते, एआय मोड आता 100 मिलियन यूजर्स वापरत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला गुगलचे शेअर्स 25% ने घसरले आहेत, कारण सर्चमधून मिळणारा महसूल धोक्यात आला आहे. कंपनीची निम्म्याहून अधिक कमाई आणि नफ्याच्या 75% वाटा सर्चमधून मिळतो. AI टूल्समुळे, सिंपल सर्च आता गुगलऐवजी चॅटजीपीटी सारख्या पर्यायांकडे वळत आहेत.