पावरफुल बॅटरीसह Oppo चे नवे स्मार्टफोन लाँच! डिझाईन अशी की तुम्हीही पाहतच राहाल, वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 14 Pro 5G स्मार्टफोन सिरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या सिरीजमध्ये कंपनीने Oppo Reno 14 5G आणि Oppo Reno 14 Pro 5G हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. दोन्ही स्मार्टफोन पावरफुल बॅटरी आणि आकर्षक डिझाईनसह लाँच करण्यात आले आहेत. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि इतर माहिती जाणून घेऊया.
Oppo Reno 14 5G स्मार्टफोन चीनमध्ये 12GB+256GB, 16GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 33,200 रुपये, 16GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,600 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,099 म्हणजेच सुमारे 36,800 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,100 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या टॉप-ऑफ-द-लाइन 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,100 रुपये आहे. बेस व्हेरिअंट मरमेड, पिनेलिया ग्रीन आणि रीफ ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Oppo Reno 14 Pro 5G स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB+512GB, 16GB+512GB आणि 16GB+1TB या स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 41,500 रुपये, 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,100 रुपये आणि 16GB+512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 47,400 रुपये आहे. या स्मार्टफोनच्या टॉप स्टोरेज 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 4,499 म्हणजेच सुमारे 53,400 रुपये आहे. Reno 14 5G सीरीजचा प्रो व्हेरिअंट कॅला लिली पर्पल, मरमेड आणि रीफ ब्लॅक शेड्स या रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची विक्री 23 मे पासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोन प्री-बुकिंगसाठी उपलब्ध आहे.
Oppo Reno 14 5G मध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तर प्रो व्हेरिअंटमध्ये 6.83 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 1.5K फ्लॅट OLED स्क्रीन्स आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट, 1,200 निट्स ग्लोबल पीक ब्राइटनेस, 3,840Hz PWM डिमिंग रेट आणि Oppo चे क्रिस्टल शिल्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे.
Oppo Reno 14 5G मध्ये MediaTek Dimensity 8350 प्रोसेसर आणि Reno 14 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 8450 प्रोसेसर देण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X रॅम, 1TB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज आणि Android 15-बेस्ड ColorOS 15 स्किन सपोर्ट आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo Reno 14 5G सीरीजमध्ये 50-मेगापिक्सल OIS-सपोर्टेड मेन कॅमेरा, 3.5x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सल पेरिस्कोप शूटर्स आणि 50-मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेंसर्स आहे. बेस व्हेरिअंट Reno 14 5G हँडसेटमध्ये 8-मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे, प्रो व्हेरिअंट त्याच्या अल्ट्रा-वाइड-अँगलने सुसज्ज आहे.
Oppo Reno 14 launched in China.
Price 💰 ¥2799 (₹33,218, $388, €347)Specifications
📱 6.59″ FHD+ OLED LTPS display, 120Hz refresh rate, 1200nits HBM
🔳 MediaTek Dimensity 8350 SoC, LPDDR5x RAM & UFS 3.1 storage
🍭 Android 15
📸 50MP Sony LYT600+ 8MP OV08D+ 50MP Samsung JN5… pic.twitter.com/FpdQ6emCFP— Abhishek Yadav (@yabhishekhd) May 15, 2025
Oppo Reno 14 5G मध्ये 6,000mAh बॅटरी आहे, तर प्रो व्हेरिअंटमध्ये 6,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही फोन
80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात. प्रो वर्जन 50W AIRVOOC वायरलेस फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. दोन्ही हँडसेट IP66+IP68+IP69 डस्ट आणि वाटर-रेजिस्टेंट रेटिंग्ससह लाँच करण्यात आले आहेत.
हॅलो- हॅलो, आवाज येत नाहीये? वारंवार कॉल ड्रॉप होतोय? मग, तुमच्यासाठी मोलाच्या ठरतील या Tech Tips
स्मार्टफोन्समध्ये सिक्योरिटीसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर्स आहे आणि हे 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.4, Beidou, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C कनेक्टिविटी ऑफर करतात.