OPPO Reno 14 सिरीजची लाँच डेट कन्फर्म! या दिवशी भारतात करणार एंट्री, जाणून घ्या अपेक्षित स्पेसिफिकेशन्स
अखेर OPPO ने त्यांच्या अपकमिंग Reno 14 सीरीजची भारतातील लाँच डेट कन्फर्म केली आहे. येत्या काही दिवसांतच हा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोन सिरीजमध्ये कंपनी दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये Reno 14 आणि Reno 14 Pro यांचा समावेश असणार आहे. या स्मार्टफोनची लाँच डेट 3 जुलै असणार आहे. हे स्मार्टफोन्स Reno 13 आणि Reno 13 Pro स्मार्टफोनला रिप्लेस करणार आहेत.
OPPO Reno 14 आणि Reno 14 Pro स्मार्टफोन 3 जुलै रोजी भारतात लाँच केले जाणार आहेत. OPPO चे लेटेस्ट स्मार्टफोन फ्लिपकार्ट, OPPO ई-स्टोर आणि ऑफलाइन मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहेत.
OPPO Reno 14 सीरीजचे काही स्पेसिफिकेशन्स कन्फर्म करण्यात आले आहेत. OPPO Reno 14 Pro स्मार्टफोनबाबत असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8450 चिपसेटसह लाँच केला जाणार आहे. MediaTek Dimensity 8450 चिपसेटसह लाँच होणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे. यासोबतच असं देखील सांगितलं जात आहे की, हा फोन पर्ल व्हाइट, फॉरेस्ट ग्रीन, आणि टायटॅनियम ग्रे या पर्यांयामध्ये उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – OPPO)
अपकमिंग Reno 14 Pro आणि Reno 14 स्मार्टफोन्सच्या पर्ल व्हाइट व्हेरिअंटबद्दल बोलायचे झाले तर, OPPO Velvet Glass मध्ये पहिल्यांदाच वापरण्यात आला आहे. या फोनच्या बॅक पॅनलसाठी कंपनीने सिंगल पीस स्कल्प्टेड ग्लास वापरला आहे. यासोबतच, फोनची फ्रेम एरोस्पेस-ग्रेड अॅल्युमिनियमपासून बनलेली आहे.
OPPO Reno 14 Pro मध्ये 6.83-इंचाचा 1.5K OLED डिस्प्ले असणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, ब्राइटनेस 1200 निट्स आणि स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93.6 टक्के आहे. तर, OPPO Reno 14 स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा डिस्प्ले, स्क्रीन-टू-बॉडी 93.4 टक्के आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. OPPO Reno 14 सीरीज फोनमध्ये 3,840Hz PWM डीमिंग, लो-ब्लू लाइट फिल्टरिंग आणि HDR10+ सपोर्ट दिला जाणार आहे.
Reno 14 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 8450 चिपसेट दिला जाणार आहे, ज्यामध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G720 GPU दिला जाणार आहे. OPPO ने Reno 14 स्मार्टफोनला चीनमध्ये MediaTek Dimensity 8350 सह लाँच केला जाणार आहे. OPPO Reno 14 च्या चायनीज व्हेरिअंटमध्ये 50MP चा ऑप्टिकल इमेज स्टेबलाजेशन (OIS) सपोर्ट वाला प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचा सेकेंडरी कॅमेरा 50MP चा 3.5x टेलीफोटो लेंस आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंससह येतो.
OPPO ने कन्फर्म केलं आहे की फोनमध्ये AI Editor 2.0, AI Perfect Shot, AI Recompose, आणि Google Gemini AI चा सपोर्ट मिळणार आहे. OPPO Reno 14 स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी असेल जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. तर Reno 14 Pro मध्ये 6200mAh बॅटरी मिळणार आहे.
OPPO Reno 14 सीरीजची किंमत काय असेल याबद्दल सध्या कोणतीही माहिती नाही. OPPO Reno 14 Pro बद्दल असे म्हटले जात आहे की त्याच्या बॉक्सवर 54,999 रुपये छापलेले आहेत. कंपनीने गेल्या वर्षी OPPO Reno 13 सीरीज 37,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केली होती.