
लक्झरीचा नवीन ट्रेंड सुरु! स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा..... Oppo Reno 15c चीनमध्ये लाँच, इतकी आहे किंमत
टेक कंपनी Oppo ने चीनमध्ये आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये Oppo Reno 15c या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेला नवीन स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. Reno 15 सीरीजचा नवीन स्मार्टफोन अनेक कमाल फीचर्सने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.59-इंच डिस्प्ले दिला आदहे. याशिवाय स्मार्टफोनचा कॅमेरा देखील दमदार आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या स्मार्टफोनची किंमत किती आहे आणि यामध्ये कोणते खास फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत अधिक जाणून घेऊया.
लेटेस्ट लाँच स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर या स्मार्टफोनचा 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंट CNY 2,899 म्हणजेच सुमारे 37,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनचा 512GB स्टोरेज व्हेरिअंट CNY 3,199 म्हणजेच सुमारे 41,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. कंपनीचा हा ऑल न्यू स्मार्टफोन ऑरोरा ब्लू, कॉलेज ब्लू आणि स्टारलाइट बो कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
OPPO Reno15c launched in China. – 6.59-inch display
– 6500mAh battery
– 80W fast charging
– ColorOS 16
– 360-degree armor body
– IP69 rating
– 50MP main camera 12GB/256GB – Yuan 2899
12GB/512GB – Yuan 3199 pic.twitter.com/vrxi4IPJMm — Mukul Sharma (@stufflistings) December 15, 2025
Oppo Reno 15c च्या स्पेसिफिकेशन्सबद्दल आता बोलायचं झालं तर या स्मार्टफोनमध्ये 6.59-इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 1200 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. या डिव्हाईसमध्ये 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 460ppi पिक्सेल डेंसिटी मिळणार आहे. डिव्हाईस Android 16-बेस्ड ColorOS 16 वर चालते आणि या हँडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन 7 Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट वाला 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये OIS वाला 50-मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याशिवाय या डिव्हाईसमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल देखील आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. Oppo Reno 15c मध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी दिली आहे.
Ans: OPPO ही चीनमधील (China) स्मार्टफोन कंपनी आहे.
Ans: होय, OPPO चे अनेक स्मार्टफोन भारतातच “Make in India” अंतर्गत तयार केले जातात.
Ans: OPPO फोनमध्ये ColorOS वापरले जाते, जे फिचर्सने समृद्ध आणि वापरण्यास सोपे आहे.