
लक्झरी नाही तर गरजेसाठी वापरा तंत्रज्ञान! अंतराळवीर Sunita Williams कडे केवळ इतक्या किंमतीचा स्मार्टफोन आणि घड्याळ, वाचा फीचर्स
सुनीता विल्यम्स यांच्या हातात असलेल्या Motorola Edge 50 Neo 5G ची किंमत भारतात 20 ते 25 हजार रुपयांच्या दरम्यान आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स दमदार आहेत. म्हणजेच बजेट किंमतीत ऑपर केल्या जाणाऱ्या Motorola Edge 50 Neo 5G मध्ये अनेक प्रिमियम फीचर्स उपलब्ध आहेत. Garmin Instinct या घड्याळाची किंमत 25 ते 30 हजार रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितलं जात आहे. (फोटो सौजन्य – X)
मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 1.5K pOLED LTPO डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 3000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सपोर्टसह येतो. Edge 50 Neo में मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेजच्या सपोर्टसह खरेदीसाठी उपलब्ध आहे. स्टोरेज वाढवले जाऊ शकते. हा फोन अँड्रॉईड 14 वर बेस्ड कस्टमाइज्ड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. सिक्योरिटीसाठी Motorola Edge 50 Neo 5G मध्ये ऑन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉकसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Motorola Edge 50 Neo मध्ये 65W फास्ट वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 4310mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन IP68 रेटेड आहे, याचा अर्थ या स्मार्टफोनला पाणी आणि धूळीपासून संरक्षण देण्यात आले आहे. Motorola Edge 50 Neo डिव्हाईसमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 50MP चा मुख्य OIS कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनच्या मागीला बाजूला 13MP चा अल्ट्रा वाइड आणि 10MP चा टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 32MP कॅमेरा देण्यात आला आहे.
Ans: सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर असून NASA च्या अनुभवी अंतराळ मोहिमांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.
Ans: सुनीता विल्यम्स यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 रोजी ओहायो, अमेरिका येथे झाला.
Ans: त्यांच्या वडिलांचे मूळ गुजरात, भारतातील आहे. त्यामुळे त्यांचे भारताशी विशेष नाते आहे.