OnePlus च्या या स्मार्टफोनला मिळालं OxygenOS अपडेट, युजर्सचा एक्सपीरियंस होणार अधिक मजेदार
OnePlus युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus 12R स्मार्टफोनसाठी OxygenOS 15 अपडेट रोल आऊट सुरु
झालं आहे. कंपनीचं हे नवीन अपडेट भारत आणि युरोपसह इतर अनेक देशांसाठी आणलं जात आहे. OxygenOS 15 अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत, ज्यामुळे युजर्सचा एक्सपिरियंस अधिक मजेदार होणार आहे. नवीन अपडेटमुळे स्मार्टफोनचा परफॉर्मंस देखील पूर्वीपेक्षा अधिक चांगला होणार आहे. यामध्ये नवीन ॲनिमेशन्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा- गुगलच्या या सर्च रिझल्टने हॅक होईल तुमचा डेटा! अलर्ट जारी, काय आहे प्रकरण?
OnePlus ने भारतीय युजर्ससाठी OnePlus 12R स्मार्टफोनसाठी OxygenOS 15 अपडेट आणण्यास सुरुवात केली आहे. OnePlus चं हे अपडेट युरोप आणि इतर अनेक देशांमध्ये देखील उपलब्ध होऊ लागले आहे. या अपडेटमध्ये स्मार्टफोनचा परफॉर्मंस सुधारण्यासाठी अनेक नवीन फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. नवीन अपडेट मिळाल्यानंतर फोनचा परफॉर्मन्स खूपच चांगला होणार आहे. (फोटो सौजन्य – X)
हेदेखील वाचा- इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं होणार शक्य, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या सविस्तर
डिस्प्ले – OnePlus 12R मध्ये 6.78-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits पीक ब्राइटनेस आहे.
कॅमेरा – OnePlus 12R मध्ये 16MP सेल्फी कॅमेरा आणि 50MP+8MP+2MP मागील कॅमेरा आहे.
बॅटरी – स्मार्टफोनमध्ये 100W चार्जिंगसह 5,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे.