इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं होणार शक्य, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या सविस्तर
ऑनलाईन पेमेंट सध्या आपल्या सर्वांची गरज बनले आहे. कोणत्याही दुकानात किंवा मॉलमध्ये गेल्यानंतर आपण पेमेंट करण्यासाठी आपल्या खिशातलं पाकीट नाही तर मोबाईल काढतो. आपण स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज कुठेही UPI पेमेंट करू शकतो. पण UPI पेमेंट करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इंटरनेट. इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करणं अवघड आहे, असं तुम्हाला सुद्धा वाटत का? पण आता नाही. आता तुम्ही इंटरनेटशिवाय UPI पेमेंट करू शकता.
हेदेखील वाचा- OpenAI ने खरेदी केला नवीन डोमेन! 126 करोड रुपयांना फायनल झाली डील, काय आहे खासियत? जाणून घ्या सविस्तर
अनेक वेळा असे प्रसंग येतात जेव्हा आपल्याला ऑनलाइन पेमेंट करण्याची तीव्र गरज असते. पण, इंटरनेट खूप स्लो काम करते किंवा कधी कधी इंटरनेट नेटवर्क अजिबात उपलब्ध नसते. अशा परिस्थिती युपीआय पेमेंट कसा करायचा, याबाबत प्रश्न निर्माण होतो. पण, आता तुम्हाला सरकार इंटरनेटशिवायही UPI पेमेंट करण्याचा पर्याय देणार आहे.अधिकृत USSD कोड डायल करून तुम्ही अगदी सहज हे काम करू शकता. यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासणार नाही. (फोटो सौजन्य – pinterest)
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) द्वारे लाँच केलेली, ही सेवा सुनिश्चित करते की वापरकर्ते इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय देखील बँकिंग सेवांचा वापर करण्यास सक्षम असतील. *99# सर्विस तुम्हाला विविध बँकिंग कामांसाठी मदत करते. ज्यामध्ये इंटरबँक फंड पाठवणे आणि प्राप्त करणे, अकाऊंट बॅलेंस चेक करणं, UPI पिन सेट करणे किंवा बदलणे यांचा समावेश आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत