गुगलच्या या सर्च रिझल्टने हॅक होईल तुमचा डेटा! अलर्ट जारी, काय आहे प्रकरण?
सायबर गुन्हे आणि सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक सायबर घोटाळे हे केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेट युजर्ससोबतच घडत आहेत. सायबर गुन्हेगार इंटरनेट युजर्सची फसवणूक करण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत आहेत. आतापर्यंत कधी खोटे मॅसेज पाठवून तर कधी खोटे कॉल करून लोकांची फसवूणक केली जात होती. मात्र आता गुगलच्या सर्च रिझल्टमुळे लोकांची फसवणूक होत आहे.
हेदेखील वाचा- हैदराबाद मेट्रो रेल्वेने सुरु केली नवीन सेवा, आता गुगल वॉलेटद्वारे होणार तिकीट बुकिंग
आपण आपल्या प्रत्येक कामासाठी गुगलचा वापर करतो. गुगलच्या वापराशिवाय आपला एकही दिवस पूर्ण होत नाही. आपण गुगलवर दिवसभरात शेकडो गोष्टी सर्च करत असतो. अशाच लोकांना सध्या सायबर गुन्हेगार टार्गेट करत आहेत. गुगल सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या लिंकवर क्लिक करताच तुमची वैयक्तिक माहिती हॅक होईल. तसेच तुमच्या संगणाकाचा कंट्रोल देखील हॅकर्सकडे जाईल. (फोटो सौजन्य – pinterest)
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सायबर सिक्युरिटी कंपनी SOPHOS कडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही गुगलवर Are Bengal Cats Legal in Australia? हा प्रश्न सर्च केला आणि सर्च रिझल्टमध्ये येणाऱ्या पहिल्या लिंकवर क्लिक केलं तर तुमचा डेटा हॅक होऊन तुमच्या संगणकाचा कंट्रोल हॅकर्सकडे जाईल. कंपनीचे म्हणणे आहे की हे 6 शब्द शोधणारे वापरकर्ते सायबर हल्ल्यांना बळी पडण्याचा धोका लक्षणीयरित्या वाढत आहे.
SOPHOS च्या मते, वापरकर्त्यांना या लिंक्स किंवा ॲडवेअरवर क्लिक करण्यास भाग पाडले जात आहे. या प्रकरणात, हे कायदेशीर गुगल सर्चद्वारे केले जात आहे. SOPHOS ने जारी केलेल्या अलर्टनुसार, असे दिसते की स्कॅमर विशेषत: त्यांच्या सर्चमध्ये ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेल्या लोकांना लक्ष्य करत आहेत.
हेदेखील वाचा- ॲपलनंतर गुगललाही झटका! या देशाने Google च्या Pixel स्मार्टफोनच्या विक्रीवर घातली बंदी
सायबर गुन्हेगारांच्या या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी SOPHOS इंटरनेट युजर्सना सल्ला दिला आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जेव्हा युजर्स सर्च रिझल्टवर क्लिक करतात तेव्हा त्यांची वैयक्तिक माहिती आणि बँक डिटेल्स एका प्रोग्रामच्या मदतीने ऑनलाइन शेअर केले जातात. त्यामुळे सध्या गुगलवर Are Bengal Cats Legal in Australia? हा प्रश्न सर्च करणं धोकादायक ठरू शकतं. तसेच ज्यांनी आतापर्यंत हा प्रश्न गुगलवर सर्च केला आहे. त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या गुगल अकाऊंटचा पासवर्ड बदलणं गरजेचं आहे.
Sophos Ltd. ही एक ब्रिटिश सुरक्षा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर कंपनी आहे. जॅन ह्रुस्का आणि पीटर लॅमर यांनी केली आणि 1985 मध्ये SOPHOS ची स्थापन केली. सायबर फ्रॉड आणि स्कॅम सारख्या घटनांवर SOPHOS लक्ष ठेवते.