
मित्रांसोबत ट्रिपचं बिल वाटणं झालं सोपं! Paytm ने आणलं 'Split Bills' फीचर, कसं काम करतं ते जाणून घ्या
युझर्ससाठी मोठी बातमी! Google Pay, PhonePe अन् Paytm वर दिसणार नाही ‘हा’ नंबर; NPCI चा नवीन आदेश
या नवीन फिचरच्या मदतीने मित्रमंडळी आपला ग्रुप तयार करुन यात शेयर्ड एक्सपेंसेस एकाच जागी ॲड करु शकतात. यानंतर इथे यूजर सर्वांमध्ये खर्च बरोबर वाटून घेण्यासाठी स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करु शकतो. एकूण रकमेनुसार इथे तुम्हाला पर्सेंटेज किंवा शेयरिंगच्या हिशोबाने खर्च योग्य रितीने सर्वांमध्ये बरोबर वाटता येईल. यात ग्रुप समरीचाही ऑप्शन आहे ज्यात तुम्हाला ट्रीपमध्ये टोटल किती खर्च झाला, प्रत्येकाला किती पैसे द्यायचे आहेत आणि पेंडिंग बॅलेन्स किती आहे या सर्वांचा हिशोब मिळेल. याच्या मदतीने ट्रीपवेळी जेव्हा अनेक लोक वेगवेगळ्या गोष्टींसाठी पैसे देतात तेव्हा तो खर्च डिव्हाईड करण्यात जे कन्फ्यूजन निर्माण होते ते दूर करण्यास मदत मिळते.
पेमेंट रिमाइंडर्स
या फिचरच्या मदतीने यूजर सर्व सदस्यांना पेंमेंटसाठीचा एक रिमाइंडर देखील पाठवू शकतो. ज्या लोकांनी पेमेंट केले नाही किंवा ज्यांचे पेमेंट करणे राहिले आहे त्यांना पेमेंटची आठवण करुन देण्यासाठी हे फिचर मोठ्या कामाचे ठरते. जर एखाद्या व्यक्तीने ॲपच्या बाहेरून पैसे दिले असतील, तर व्यवहाराची नोंद अद्ययावत ठेवण्यासाठी त्या पेमेंटला ‘Marked as Received’ म्हणून चिन्हांकित करता येते. याशिवाय, यूजर रोख रक्कम, कार्ड, दुसरे UPI ॲप किंवा इतर कोणत्याही पेमेंट पद्धतीने केलेला खर्चही या फीचरमध्ये सहज नोंदवू शकतात. कंपनीचे म्हणणे आहे की, या फिचरच्या मदतीने यूजर्स आपल्याला हवे तितके एक्सपेंसेस ॲड करु शकतात. मुख्य म्हणजे फिचरच्या वापरासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीयेत.
Paytm Split Bills फिचरचा वापर कसा करावा?