Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
सध्याच्या काळात स्मार्टफोन केवळ एक गॅझेट नाही तर आपली गरज बनला आहे. महागडा आणि प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करण्यापेक्षा असे अनेक लोकं आहेत जे मिडरेंज स्मार्टफोनला अधिक पसंती दर्शवतात. अशाच दोन मिड रेंज स्मार्टफोनबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. Poco ने M7 सीरीज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत, ज्यामध्ये Poco M7 Pro 5G (8GB RAM + 256GB) आणि Poco M7 Plus 5G यांचा समावेश आहे.
अनेक स्मार्टफोन युजर्सच्या मनात एकच प्रश्न आहे की या दोन्ही स्मार्टफोनपैकी नक्की कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे, कोणता स्मार्टफोन अधिक चांगला परफॉर्मंस ऑफर करता, याबाबत आता जाणून घेऊया. येथे आपण या दोन्ही फोनची तुलना करत आहोत, यामध्ये आपल्याला कळेल की तुमच्यासाठी कोणता फोन सर्वोत्तम पर्याय आहे. येथे आपण या डिव्हाइसेसबद्दल जाणून घेऊ. (फोटो सौजन्य – pinterest)
Poco M7 Pro 5G चे डिझाईन कॉम्पॅक्ट आणि प्रीमियम अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच gOLED डिस्प्ले आहे, जो HDR10+ आणि Dolby Vision सपोर्ट आहे. या स्मार्टफोनची ब्राइटनेस 2100 निट्सपर्यंत सपोर्ट आहे, ज्यामुळे उन्हात देखील अगदी स्पष्ट दिसू लागते. या डिव्हाईसचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ~92% आहे.
तर Poco M7 Plus 5G मध्ये 6.9 इंच IPS LCD डिस्प्ले आहे, जो 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मॉडेलचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ~85% आहे. जर तुम्हाला जास्त ब्राइट आणि कलर-एक्युरेट डिस्प्ले पाहिजे असेल तर M7 Pro बेस्ट आहे, पण ज्यांना मोठी स्क्रिन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी M7 Plus बेस्ट आहे.
Poco M7 Pro 5G मध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra चिपसेट आहे, जो 2.5 GHz स्पीड ऑफर करतो. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित HyperOS वर चालतो. यासोबतच या स्मार्टफोनमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज देण्यात आले आहे, ज्यामुळे गेमिंग आणि मल्टीटास्किंग सोपं होतं. तर, Poco M7 Plus 5G मध्ये Qualcomm Snapdragon 6s Gen 3 प्रोसेसर आहे, जो Android 15 आणि HyperOS 2 वर चालतो. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, 6GB वर्चुअल रॅमला सपोर्ट करतो. हेवी गेम्ससाठी M7 Pro जास्त स्मूद आणि जलद अनुभव देतो.
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 50MP + 2MP चा डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे, मात्र Poco M7 Pro 5G मध्ये Sony LYT 600 सेंसरसह OIS (Optical Image Stabilization) देण्यात आला आहे, हे लो-लाइट आणि व्हिडीओ स्टेबिलिटीमध्ये बेस्ट आहे. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर M7 Pro मध्ये 20MP सेल्फी कॅमेरा आहे, तर M7 Plus मध्ये केवळ 8MP कॅमेरा आहे. जर तुम्ही सोशल मीडिया कंटेंट तयार करत असाल किंवा सेल्फी उत्साही असाल तर M7 Pro तुमच्यासाठी अधिक योग्य आहे.
M7 Plus 5G मध्ये 7000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तर M7 Pro 5G मध्ये 5110mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. जर तुम्हाला जास्त बॅकअप हवा असेल तर M7 Plus अधिक चांगला आहे.
Poco M7 Pro 5G चा 8GB + 256GB व्हेरिअंट 14,899 रुपयांत लाँच करण्यात आला आहे. तर Poco M7 Plus 5G (6GB + 128GB) व्हेरिअंटची किंमत 13,999 रुपये आहे.