Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
तुम्ही देखील 15 हजार रुपयांच्या किंमतीत एखादा बजेट स्मार्टफोन शोधत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक ब्रँड Redmi ने एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. Redmi चा नवीन स्मार्टफोन Redmi 15 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. बजेट स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे डिव्हाईस वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक ढासू फीचर्स देण्यात आले आहेत.
Redmi 15 5G हा स्मार्टफोन 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 14,999 रुपये आहे. तर 8GB + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 16,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही 28 ऑगस्टपासून Amazon, Xiaomi India वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून हे डिव्हाइस खरेदी करू शकाल. हा फोन फ्रोस्टेड व्हाइट, मिडनाईट ब्लॅक आणि सँडी पर्पल या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)
The Power Revolution has begun!
The Redmi 15 5G is here to set new benchmarks:
▪️EV-grade silicon carbon 7000mAhA Battery
▪️Snapdragon power with AI
▪️Largest, smoothest display in the segment*
▪️Slimmest 7000mAh phone in the segment*Starting at ₹14,999.
Sale starts 28th Aug! pic.twitter.com/Kt7Ri3ZJo5— Redmi India (@RedmiIndia) August 19, 2025
स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर Redmi 15 5G मध्ये 6.9 इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 144Hz चा रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. फोनची स्क्रीन लो ब्लू लाइट, फ्लिकर फ्री आणि सर्कॅडियन-फ्रेंडली मानकांसाठी TÜV राइनलँड प्रमाणपत्रासह येते. डिव्हाईसमध्ये खास स्नॅपड्रॅगन 6s जेनरेशन 3 चिपसेट देण्यात आला आहे.
BSNL चा स्वस्त रिचार्ज प्लॅन शोधताय? 2GB डेली हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग… किंमत केवळ इतकी
यासोबबतच या नवीन बजेट स्मार्टफोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये अँड्रॉयड 15 बेस्ड हाइपरओएस 2.0 मिळणार आहे. कंपनीने असं वचन दिलं आहे की, फोनला दोन वर्षांसाठी ओएस अपग्रेड आणि चार वर्षांसाठी सुरक्षा अपडेट दिले जाणार आहेत. याशिवाय, डिव्हाइसमध्ये गुगलचे जेमिनी आणि सर्कल टू सर्च सारखे एआय फीचर्स देखील देण्यात येत आहेत. यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.
कॅमेऱ्याच्या बाबतीत देखील स्मार्टफोन अतिशय उत्तम आहे. Redmi 15 5G स्मार्टफोनमध्ये AI-backed 50-मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये समोरील बाजूस सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्यात अनेक AI फीचर्स देखील आहेत जसे की हे डिव्हाइस AI स्काय, AI ब्युटी आणि AI इरेज देखील आहे. याशिवाय, डिव्हाइसमध्ये मोठी 7,000mAh बॅटरी आणि 33W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.