Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

Poco X8 And Poco X8 Power Launched: पोकोने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन्स बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 06, 2026 | 10:27 AM
POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

POCOने पुन्हा मारली बाजी! दोन तगड्या स्मार्टफोन्ससह भारतात एंट्री, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • किंमत ₹30 हजारांखाली: पोको एक्स 8 ची किंमत ₹29,999 पासून सुरू होते, तर ऑफर्सनंतर हा फोन ₹26,999 मध्ये मिळणार आहे.
  • पावर मॉडेलमध्ये 10,000mAh बॅटरी: पोको एक्स 8 पावर मध्ये 100W फास्ट चार्जिंगसह तब्बल 10,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
  • 11 सप्टेंबरपासून विक्री: पोको एक्स 8 आणि पोको एक्स 8 पावर ची विक्री 11 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे.
Poco Smartphones Launched: टेक कंपनी पोकोने त्यांच्या मिड-रेंज X8 लाइनअपमधील चौथे मॉडेल Poco X8 Power भारतात लाँच केले आहे. हा स्मार्टफोन स्टँडर्ड Poco X8 सह लाँच करण्यात आला आहे. कंपनीचे हे दोन्ही नवीन स्मार्टफोन्स अलीकडेच भारतात लाँच करण्यात आलेल्या पोको एक्स 8 प्रो आणि पोको एक्स 8 प्रो मॅक्स लाइनअपमध्ये समाविष्ट झाले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री लवकरच ई कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे सुरु होणार आहे. मिड-रेंज किंमतीत लाँच करण्यात आलेल्या नवीन स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्स 8 ची भारतात किंमत

पोको एक्स 8 च्या बेस व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आणि पोको एक्स 8 पावरची किंमत 35,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 2 हजार रुपयांचे कूपन डिस्काऊंट आणि 1 हजार रुपयांचे एक्स्ट्रा एक्सचेंज बोनस देखील ऑफर करत आहे. या ऑफर्सनंतर स्मार्टफोन्सची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आणि 32,999 रुपये होणार आहे. या दोन्ही स्मार्टफोन्सची विक्री 11 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. पोको एक्स 8 पावर ब्लॅक आणि येलो कलर ऑप्शन्समध्ये तर पोको एक्स 8 ब्लॅक, फायरी ऑरेंज आणि फ्रॉस्ट व्हाइट शेड्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Poco) 

पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्सचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्स डुअल-सिम स्मार्टफोन्स आहेत, जे शाओमीच्या अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 वर चालतो. कंपनीने या दोन्ही डिव्हाईससाठी 4 मोठे ओएस अपग्रेड्स आणि 6 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट्स देणयाचे वचन दिले आहे. कंपनीच्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.83-इंच 1.5K (1,280 x 2,772 पिक्सेल) अमोलेड डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, एचडीआर 10+, डॉल्बी व्हिजन, 3,200Hz पर्यंत इंस्टेंटेनियस टच सँपलिंग रेट, 3,500 निट्सची पीक ब्राइटनेस, 100% DCI-P3 कलर गॅमट, TUV ट्रिपल आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशन, वेट टच 2.0 आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह येतो. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी या स्मार्टफोनमध्ये IP66 + IP68 + IP69 + IP69K रेटिंग्स दिली आहे.

चिपसेट

परफॉर्मंससाठी पोको एक्स 8 पावरमध्ये क्वालकॉमचा 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 जेन 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो 2.6GHz पर्यंत पीक क्लॉक स्पीड देतो. तसेच, पोको एक्स 8 मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6 एस जेन 4 चिपसेट मिळणार आहे, ज्याची पीक क्लॉक स्पीड 2.4GHz पर्यंत आहे. दोन्ही स्मार्टफोन्समध्ये ॲड्रेनो जीपीयू दिला आहे. पावर मॉडेलमध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज दिले आहे, तर स्टँडर्ड मॉडेल एलपीडीडीआर4एक्स रॅमने सुसज्ज आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे.

फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामपासून गेमिंगपर्यंत… ऑनलाईन जगात मुलं सुरक्षित आहेत का? युनिसेफच्या अहवालाने वाढली पालकांची चिंता

कॅमेरा

कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, पोको एक्स 8 पावर आणि पोको एक्स 8 मध्ये रियर पॅनलवर डुअल कॅमेरा यूनिट दिले आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सपोर्टवाला 50-मेगापिक्सेल (f/1.8) चा सेंसर आहे. पावर मॉडेलमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. तर पोको एक्स 8 मध्ये 2-मेगापिक्सेलचा डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पोको एक्स 8 पावरमध्ये 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तर पोको एक्स 8 मध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट शूटर दिला आहे.

बॅटरी

पोको एक्स 8 पावरमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 10,000mAh बॅटरी दिली आहे. पोको एक्स 8 मध्ये 67W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 22.5W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 9,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Poco x8 and poco x8 power launched in india read features specifications and price of the smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2026 | 10:27 AM

Topics:  

  • poco
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही
1

Lamborghiniचा तडका अन् Tecnoची टेक्नॉलॉजी! कंपनीचा लिमिटेड एडिशन स्मार्टफोन लाँच, लूक पाहून तुमचीही नजर हटणार नाही

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क
2

नव्या Infinix स्मार्टफोनने वेधलं टेक विश्वाचं लक्ष, ‘हे’ भन्नाट फीचर ठरलं खास आकर्षण! फीचर पाहून व्हाल थक्क

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!
3

नाव Lite, पण ताकद मात्र जबरदस्त! V80 Lite 5G ची मलेशियात धडाकेबाज एंट्री, फोनमध्ये नेमकं काय खास? वाचून तुम्हीही म्हणाल, कमाल!!

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे
4

स्मार्टफोन खरेदीचा बजेट बिघडणार! Vivo T5x आणि iQOO Z11x च्या किंमती वाढल्या, आता मोजावे लागणार इतके पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.