
फोन वारंवार चार्ज करण्याची कटकट संपणार? Redmi K100 मध्ये मिळणार तब्बल 10,000mAh बॅटरी, लाँचपूर्वीच चर्चा सुरु
रेडमी के 100 हा कंपनीचा पहिला स्मार्टफोन असणार आहे, ज्यामध्ये 10,000mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फोनमध्ये कंपनीच्या लेटेस्ट Jinshajiang बॅटरी टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. शाओमीचं असं म्हणणं आहे की, नवीन बॅटरी 28% सिलिकन-कार्बन कंटेंट आणि एनर्जी डेन्सिटी 957Wh/L आहे, -20 डिग्री टेंप्रेचरवर देखील स्टेबल हाय परफॉर्मेंस ऑपरेशन ऑफर करते. (फोटो सौजन्य: X)
शाओमीचे प्रेसिडेंट Lu Weibing ने यांनी असा दावा केला आहे की, हा स्मार्टफोन सिंगल चार्जवर 29 तासांचा शॉर्ट-व्हिडीओ प्लेबॅक, 24 तासांचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि 47 तासांचे म्यूजिक प्लेबॅक ऑफर करण्यास सक्षम आहे. यासोबतच, कंपनीने असा दावा केला आहे की, हे डिव्हाईस 18 तासांपर्यंत नेव्हिगेशन, 46 तासांपर्यंत वाचन आणि 1,000 पर्यंत शॉर्ट ड्रामा एपिसोड्स प्लेबॅक करण्यास सक्षम आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन 100W वायर्ड चार्जिंग आणि 27W वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करणार आहे. तसेच, या डिव्हाईसमध्ये बायपास चार्जिंग फीचर देखील दिले जाऊ शकते.
आगामी रेडमी के 100 स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच डिस्प्ले ऑफर केला जाऊ शकतो, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz, पीक ब्राइटनेस 3,500 निट्सची आहे. हा फोन 480Hz मल्टी फिंगर टचला सपोर्ट करणार आहे. शाओमीचं असं म्हणणं आहे की, फोनमध्ये 40 हून अधिक गेम 165fps वर खेळू शकता.
कंपनीने आधीच कंफर्म केले आहे की, रेडमीचा हा आगामी फोन स्नॅपड्रॅगन 8 एलीट प्रोसेसर आणि D2 गेमिंग डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही दुसरी चिप गेमिंगदरम्यान ग्राफिक्स आणि फ्रेम रेटमध्ये सुधारणा करेल. हा फोन ‘हायपरओएस 4 सह येईल आणि यात मागील बाजूला आडव्या मांडणीतील कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यावर ‘बोस’ द्वारे ट्यून केलेल्या ऑडिओचे ब्रँडिंगही पाहायला मिळेल.
Ans: Redmi K100 स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत तारीख अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र, कंपनीने या आगामी स्मार्टफोनबाबत टीझरद्वारे माहिती शेअर केली आहे.
Ans: Redmi K100 मध्ये 10,000mAh क्षमतेची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही बॅटरी दीर्घकाळ वापरासाठी उपयुक्त ठरू शकते.
Ans: या स्मार्टफोनमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 27W वायर्ड रिव्हर्स चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो. याशिवाय, बायपास चार्जिंग फीचरही दिले जाण्याची शक्यता आहे.