
6700mAh बॅटरीसह नवा Poco 5G स्मार्टफोन लाँच! 50MP कॅमेरा अन् 120Hz OLED डिस्प्लेसह मिळणार तगडे फीचर्स, वाचा सविस्तर
पोको एक्स 8 एस दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB+256GB आणि 12GB+512GB यांचा समावेश आहे. डिव्हाईसच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत VND 11,500,000 म्हणजेच सुमारे 42 हजार रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत VND 14,000,000 म्हणजेच सुमारे 51 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ब्लॅक, व्हाइट आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. पोकोने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची प्री-ऑर्डर सुरु झाली आहे. (फोटो सौजन्य: Poco)
पोको एक्स 8 एस स्मार्टफोनमध्ये 6.35-इंच 1.5K एलटीपीओ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 3,500 निट्सपर्यंत आणि साइड बेजल्स 1.18mm ची आहे.
पोकोचा हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8 जीबी आणि 12 जीबी एलपीडीडीआर5एक्स रॅम तसेच 256 जीबी आणि 512 जीबी UFS 4.0 स्टोरेज पर्यायांसह लाँच करण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी पोको स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आला आहे. पोको हँडसेटमध्ये 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. पोको स्मार्टफोन अँड्रॉईड 16 वर आधारित हायपरओएस 3 आणि IP68 रेटिंगसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 100W वायर्ड चार्जिंग आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,330mAh बॅटरी दिली आहे.
कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, पोको फोनमध्ये 5G, वायफाय 7, ब्लूटूथ 5.4, एनएफसी आणि यूएसबी टाइप-सी पोर्टची सुविधा आहे. याव्यतिरिक्त, या फोनमध्ये इन्फ्रारेड ब्लास्टर दिलेला असून तो मेटल फ्रेमसह येतो.
Ans: Poco X8s स्मार्टफोन कंपनीने व्हिएतनाममध्ये लाँच केला आहे.
Ans: या स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सुमारे ४२,००० रुपये, तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सुमारे ५१,००० रुपये आहे.
Ans: Poco X8s मध्ये 6.35-इंचाचा 1.5K LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,500 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळते.