Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी रेल्वेने सुरु केलं नवीन App, अशा पद्धतीने नोंदवा तुमची तक्रार

ट्रेन प्रवासादरम्यान अनेक लोकांचे मोबाईल हरवतात किंवा चोरीला जातात. या घटनांमुळे प्रवाशांना प्रचंड त्रास होतो. याच सर्व घटना लक्षात घेऊन आता रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 06, 2025 | 07:45 PM
ट्रेनमध्ये चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी रेल्वेने सुरु केलं नवीन App, अशा पद्धतीने नोंदवा तुमची तक्रार

ट्रेनमध्ये चोरीला गेलेला मोबाईल शोधण्यासाठी रेल्वेने सुरु केलं नवीन App, अशा पद्धतीने नोंदवा तुमची तक्रार

Follow Us
Close
Follow Us:

भारतात प्रवास करण्यासाठी ट्रेनचा सर्वात जास्त वापर केला जातो. ट्रेनला मुंबईची लाईफलाईन म्हटलं जातं. जर एक दिवस ट्रेन बंद असेल तर लाखो लोकांचे हाल होतात. कामावर जाण्यासाठी असो किंवा गावी जाण्यासाठी बहुतेक लोकं ट्रेनचाच पर्याय निवडतात. ट्रेनमुळे तुम्ही अगदी कमी किंमतीत आणि सर्वात जलद कुठेही पोहोचू शकता. जवळपास सर्वचजण ट्रेनने प्रवास करत असल्याने ट्रेनला प्रचंड गर्दी होते. अक्षरश: लोकांना बाहेर लटकून प्रवास करावा लागतो.

Elon Musk ची कमाल, न्यूरालिंक पहिल्यांदाच मानवांमध्ये बसवणार Blindsight चिप! अंध व्यक्तीदेखील पाहू शकणार सुंदर जग

ट्रेनमधील याच गर्दीचा फायदा चोरांकडून घेतला जातो. ट्रेनमध्ये मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. गर्दी असल्यामुळे आपला मोबाईल चोरीला गेला आहे, हे अनेकांना समजत देखील नाही. जेव्हा आपल्याला मोबाईल चोरीबद्दल समजतं, तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि या सर्वांमुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. याच सर्व गोष्टींचा विचार करून आता रेल्वेने एक मोठं पाऊल उचललं आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

रेल्वेने एक नवीन अ‍ॅप सुरु केला आहे, ज्याद्वारे प्रवाशाचा मोबाईल चोरीला गेल्यास तो सहजपणे ट्रॅक करता येतो. खरं तर, दूरसंचार विभाग (DoT) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनी संयुक्तपणे एक नवीन पाऊल उचलले आहे ज्यामुळे मोबाईलचा ट्रेसिंग, ब्लॉकिंग आणि रिकव्हरी आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे. रेल्वेने सुरु केलेली ही सुविधा ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिसाठी फायदेशीर ठरणार आहे.

दूरसंचार विभागाचे ‘संचार साथी’ पोर्टल आता भारतीय रेल्वेच्या ‘रेल मदत’ अ‍ॅपशी एकत्रित करण्यात आले आहे. या प्रणालीद्वारे, प्रवासी त्यांच्या हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलबद्दलची तक्रार थेट ‘रेल मदत’ अ‍ॅपवर नोंदवू शकतात. ही तक्रार आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पोहोचेल जिथून मोबाईल ब्लॉक केला जाईल जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये आणि त्याचे ट्रॅकिंग सुरू करता येईल.

यात्रीगण कृपया ध्यान दे!

अब आप Railway Station या Train में अपने गुम/चोरी हुए Mobile Phone को RPF और Sanchar Saathi की मदद से Block और Trace कर सकते है pic.twitter.com/c3j6ETbV01

— DoT India (@DoT_India) April 3, 2025

संचार साथी पोर्टलवर या सुविधा उपलब्ध

या पोर्टलवर अनेक सुविधा उपलब्ध आहेत ज्यामुळे मोबाईल फोन शोधणे आणखी सोपे होते.

ब्लॉकिंग सुविधा: पोर्टलवर तक्रार करून कोणीही त्याचा हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल ब्लॉक करू शकतो.

ट्रेसिंग आणि रिकव्हरी: मोबाईल ट्रेसिंग आणि रिकव्हरी याबद्दल पोलिस आणि आरपीएफला माहिती दिली जाते.

सायबर गुन्ह्यांचा अहवाल देणे: हे पोर्टल दूरसंचार संसाधनांचा गैरवापर, सायबर फसवणूक आणि इतर डिजिटल गुन्ह्यांच्या तक्रारी नोंदवण्याची सुविधा देखील प्रदान करते.

हिऱ्यांनी जडलेला iPhone पाहून तुमचेही डोळ दिपतील! अशी आहे खास डिझाईन, किंमत पाहून तुमचंही डोकं चक्रावेल

अशा प्रकारे नोंदवा तुमची तक्रार

प्रवासादरम्यान तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तुम्ही या अ‍ॅपवर सहजपणे तक्रार दाखल करू शकता. यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला Rail Madad अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल आणि त्यात हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलची तक्रार नोंदवावी लागेल.
यानंतर तक्रार आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पोहोचेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही www.sancharsaathi.gov.in वर थेट भेट देऊन तुमचा मोबाईल ब्लॉक करण्याची प्रक्रिया पूर्ण करू शकता .

Web Title: Railway launch new app to help train passengers if their mobile get stolen tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • apps
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर
1

Tech Tips: या अपडेटेड फीचर्सशिवाय तुमचा नवा फ्रीजही काहीच कामाचा नाही! जाणून घ्या सविस्तर

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार
2

Jio नंतर आता Airtel ने युजर्सना दिला धक्का! बंद केला हा स्वस्त प्लॅन, रिचार्जसाठी जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो
3

Tech Tips: पावसाळ्यात स्मार्टफोनचा वापर करणं ठरू शकतं धोकादायक, क्षणातच होऊ शकतो ब्लास्ट! या टिप्स करा फॉलो

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच
4

Made by Google 2025: अवघे काही तास शिल्लक! लवकरच सुरु होणार Google चा सर्वात मोठा टेक ईव्हेंट, हे गॅझेट्स होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.