Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nobel Prize 2026: विज्ञानविश्वात ऐतिहासिक क्षण! प्रकाशाने मेंदूतील पेशींवर नियंत्रण मिळवणाऱ्या 3 महान शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर

Nobel Prize 2026 : नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवारी सुरू झाली. सर्वप्रथम शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील विजेत्यांची घोषणा करण्यात आली. यावेळी तीन शास्त्रज्ञांना संयुक्तपणे नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे: कार्ल डायसेरोथ, पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Oct 05, 2026 | 04:34 PM
Nobel Prize in Medicine 2026 Karl Deisseroth Nobel Prize Peter Hegemann Georg Nagel

Nobel Prize in Medicine 2026 Karl Deisseroth Nobel Prize Peter Hegemann Georg Nagel

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकशास्त्रातील नोबेल जाहीर
  • प्रकाशाच्या साहाय्याने मेंदूवर नियंत्रण
  • मानवी आरोग्य उपचारांत नवी क्रांती

स्वीडनमधील स्टॉकहोम येथील प्रसिद्ध कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटच्या नोबेल असेंब्लीने २०२६ च्या शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र (Physiology or Medicine) क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाची (Nobel Prize 2026) अधिकृत घोषणा केली आहे. या वर्षीचा सर्वोच्च सन्मान अमेरिकेचे डॉ. कार्ल डायसेरोथ, जर्मनीचे पीटर हेगेमन आणि जर्मनीचे जॉर्ज नागेल या तीन दिग्गज संशोधकांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला आहे. ‘लाइट-गेटेड आयन चॅनेल्स’ची ओळख पटवून देऊन ‘ऑप्टोजेनेटिक्स’ (Optogenetics) या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा पाया रचल्याबद्दल या शास्त्रज्ञांची जागतिक स्तरावर निवड करण्यात आली आहे.

आपला मेंदू ही अब्जावधी चेतापेशींची (न्यूरॉन्स) बनलेली एक गुंतागुंतीची आणि अद्भुत प्रणाली आहे. या पेशी एकमेकांशी विद्युत संकेतांच्या (Electrical Signals) माध्यमातून संवाद साधतात. परंतु, विशिष्ट नसा पेशींची कार्यप्रणाली कशी असते आणि त्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना कशा नियंत्रित करतात, हे समजणे आतापर्यंत विज्ञानासाठी एक मोठे आव्हान होते. या तिन्ही शास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या तंत्रज्ञानामुळे आता चक्क प्रकाशाच्या किरणांचा वापर करून विशिष्ट चेतापेशींना सुरू किंवा बंद करणे (Activating or Deactivating Neurons) शक्य झाले आहे.

शैवालावरील संशोधनातून झाली क्रांतिकारी तंत्रज्ञानाची सुरुवात

या क्रांतिकारी शोधामागची कहाणी अतिशय रंजक आहे. जर्मनीचे शास्त्रज्ञ पीटर हेगेमन हे पाण्यातील अतिसूक्ष्म वनस्पती म्हणजेच शैवाल (Algae) प्रकाशाच्या दिशेने कसे पोहतात किंवा हालचाल करतात, यावर मूलभूत संशोधन करत होते. या संशोधनादरम्यान जॉर्ज नागेल यांच्या सहकार्याने त्यांना शैवालामध्ये ‘चॅनेलऱ्होडॉप्सिन’ (Channelrhodopsin) नावाचे एक खास प्रथिन (Protein) आढळले. हे प्रथिन पेशीसाठी एका नैसर्गिक प्रकाश-संवेदी सेन्सरप्रमाणे (Light-sensitive Sensor) कार्य करते.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

यानंतर शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत या प्रथिनाचा वापर इतर सजीवांच्या पेशींवर केला. जेव्हा त्यांनी इतर पेशींमध्ये हे चॅनेलऱ्होडॉप्सिन प्रथिन समाविष्ट केले आणि त्यावर विशिष्ट रंगाचा प्रकाश टाकला, तेव्हा त्या पेशींनीसुद्धा त्वरित विद्युत संकेत निर्माण करण्यास सुरुवात केली. अमेरिकेचे डॉ. कार्ल डायसेरोथ यांनी या शोधाचा वापर मेंदूच्या गुंतागुंतीच्या नसांवर करून ‘ऑप्टोजेनेटिक्स’ या नव्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर जगात सर्वप्रथम यशस्वीपणे करून दाखवला.

मानवी आरोग्य आणि मज्जासंस्थेच्या उपचारांसाठी एक वरदान

नोबेल समितीने या शोधाचे महत्त्व अधोरेखित करताना स्पष्ट केले की, हा शोध केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित नसून मानवी आरोग्यासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी अतिशय क्रांतिकारक पाऊल आहे. मानवी मेंदूतील पार्किन्सन्स, अल्झायमर, तीव्र नैराश्य (Depression), अपस्मार आणि व्यसनाधीनता यांसारख्या आजारांवर उपचार शोधण्यासाठी हे तंत्रज्ञान आज जगभरातील वैद्यकीय संशोधकांसाठी सर्वात महत्त्वाचे साधन बनले आहे.

पूर्वी मेंदूतील आजारांवर अभ्यास करताना संपूर्ण मेंदूवर औषध किंवा विजेचा धक्का द्यावा लागत असे, ज्यामुळे अनेक दुष्परिणाम (Side Effects) होत असत. मात्र, ऑप्टोजेनेटिक्समुळे केवळ बाधित झालेल्या विशिष्ट चेतापेशींना प्रकाशाच्या माध्यमातून अचूकपणे नियंत्रित केले जाऊ शकते. यामुळे निरोगी पेशींवर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Plague Scare : रशियात न्यूमोनिक प्लेगची भीती? प्रयोगशाळेत कर्मचाऱ्याचा मृत्यू, 200 जण क्वारंटाईन

२०२६ च्या नोबेल पुरस्कारांचे आगामी वेळापत्रक

वैद्यकशास्त्रातील पुरस्काराच्या घोषणेने २०२६ च्या नोबेल सप्ताहाला सुरुवात झाली आहे. नोबेल समितीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार:

  • ६ ऑक्टोबर (मंगळवार): भौतिकशास्त्र (Physics) नोबेल पारितोषिक
  • ७ ऑक्टोबर (बुधवार): रसायनशास्त्र (Chemistry) नोबेल पारितोषिक
  • ८ ऑक्टोबर (गुरुवार): साहित्य (Literature) नोबेल पारितोषिक
  • ९ ऑक्टोबर (शुक्रवार): शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize)
  • १० ऑक्टोबर (शनिवार/सोमवार): अर्थशास्त्र (Economics) क्षेत्रातील नोबेल पुरस्कार

मानवी आरोग्याला एक नवी दिशा देणाऱ्या आणि मेंदूच्या गूढ रहस्यांचा उलगडा करणाऱ्या या तीनही महान शास्त्रज्ञांचे जगभरातील वैज्ञानिक समुदायातून जोरदार स्वागत आणि अभिनंदन केले जात आहे.

Web Title: Nobel prize in medicine 2026 karl deisseroth peter hegemann georg nagel optogenetics hp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • nobel prize
  • science news
  • World news

संबंधित बातम्या

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
1

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ
2

Yemen Houthi war : येमेनमध्ये मोठा युद्धघोष! सरकारने हुथी विद्रोहींविरोधात पुकारले अंतिम युद्ध; भूभाग मुक्त करण्याची घेतली शपथ

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस
3

Donald Trump : कुठल्या जगात जगतात ट्रम्प? ब्राझीलऐवजी घेतले भारताचे नाव आणि सोशल मीडियावर ट्रोलिंगचा पाऊस

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक
4

War Alert : ताजिक-अफगाण सीमेवर रशियाकडून अति-आधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती; आज मॉस्कोमध्ये महत्त्वाची आंतरराष्ट्रीय बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.