
WhatsApp Update: मेसेजिंग अॅप घेऊन येतंय नवीन Reaction Sticker फीचर, iOS यूजर्ससाठी बदलणार स्टेटसचा अनुभव
Livpure ने लाँच केली 2X पॉवर फिल्टर असलेली नवी वॉटर प्युरिफायर रेंज, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, ज्या टेस्टर्सने TestFlight अॅपद्वारे WhatsApp beta for iOS 25.35.10.70 इंस्टॉल केले आहे, त्यांना या नवीन फीचरच्या टेस्टिंगचा एक्सेस देण्यात आला आहे. या फीचरमध्ये यूजर्स कोणत्याही ईमोजीला स्टेटसमध्ये एका स्टिकरप्रमाणे जोडू शकणार आहेत. जेव्हा एखादा व्ह्युवर तुमचा स्टेटस बघेल तेव्हा त्याला तो ईमोजी स्टिकर स्क्रीनवर स्पष्टपणे दिसणार आहे. त्या स्टिकरवर टॅप केल्यानंतर यूजर्स रिअॅक्शन पाठवू शकतात, यासाठी मेन्यू ओपन करण्याची किंवा स्वाईप करण्याची देखील गरज नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, व्ह्युवर्सने शेअर केलेली रिअॅक्शन गुप्त राहणार आहे. ज्या यूजर्सने स्टेटस पोस्ट केला आहे, केवळ त्यालाच या रिअॅक्शन दिसणार आहेत. हे प्रायव्हसी सेटअप इंस्टाग्रामच्या डीएम रिअॅक्शन्ससारखेच आहे, परंतु व्हॉट्सअॅप ते सोप्या पद्धतीने लाँच करण्याचा प्रयत्न करत आहे.
नवीन फीचर काही प्रमाणात इंस्टाग्राम स्टोरीप्रमाणे आहे. इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये क्रिएटर्स इमोजी स्टिकर जोडून फॉलोवर्सना इंटरअॅक्ट करण्यासाठी प्रेरित करतात. WhatsApp चेही हेच उद्दिष्ट आहे, म्हणजे यूजर्सना स्टेटसवर कमेंट करणे किंवा प्रतिक्रिया देणे अधिक सोयीस्कर व्हावे. यापूर्वी स्टेटसवर रिअॅक्शन देण्यासाठी यूजर्सना खाली स्वाईप करावे लागत होते, त्यानंतर मेन्यू ओपन व्हायचा. मात्र आता इमोजी थेट कंटेंटवर असेल, ज्यामुळे इंटरएक्शनची शक्यता लक्षणीयरीत्या वाढेल.
डिफॉल्ट रूपात WhatsApp हार्ट-आइज इमोजी दाखवतो. मात्र यूजर्स हा ईमोजी त्यांच्या इच्छेनुसार बदलू शकणार आहेत. म्हणजेच जर स्टेटस मजेदार असेल तर यूजर्स हसायचा ईमोजी शेअर करू शकतात किंवा मोटिवेशनल स्टेटससाठी टाळ्या वाजवणारा किंवा एखाद्या मोठ्या घोषणेसाठी फायर ईमोजीचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक स्टेटसला यूजर्सच्या भावनांनुसार एक पर्सनलाइज्ड टच मिळणार आहे.
स्टेटस पाहणाऱ्या यूजर्ससाठी हे एक उत्तम फीचर असणार आहे. स्टेटस उघडताच स्क्रीनवर ईमोजी स्टिकर दिसेल, त्यावर टॅप करताच तुमची रिअॅक्शन यूजर्सकडे पाठवली जाईल.
Ans: WhatsApp दर काही आठवड्यांनी बीटा आणि स्टेबल अपडेट्सद्वारे नवीन फीचर्स रोलआउट करत असते.
Ans: हे फीचर मेसेजेसवर स्टिकरच्या स्वरूपात जलद प्रतिक्रिया देण्यासाठी वापरले जाते, ज्यामुळे चॅटिंग अधिक मजेदार होते.
Ans: Channels हे ब्रॉडकास्ट फीचर आहे ज्याद्वारे सेलिब्रिटी, ब्रँड किंवा संस्था एकतर्फी अपडेट्स शेअर करू शकतात.