Realme 15 5G: जबरदस्त फीचर्ससह Realme ची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, 80W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
स्मार्टफोन युजर्स गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट बघत होते, तो क्षण अखेर आला आहे. Realme 15 Pro 5G आणि बेस Realme 15 5G गुरुवारी भारतात लाँच करण्यात आले आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. याशिवाय या स्मार्टफोन्समध्ये अनेक AI-बॅक्ड इमेजिंग टूल्सचा देखील समावेश करण्यात आला आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.
Realme 15 Pro 5G स्मार्टफोन भारतात 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB, आणि 12GB + 512GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत भारतात 31,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये, 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आणि 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत 38,999 रुपये आहे. Realme 15 5G स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
दोन्ही स्मार्टफोनची विक्री भारतात 30 जुलैपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन Realme India वेबसाइट, Flipkart, आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोर्सद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. Realme 15 Pro 5G खरेदी करण्यासाठी निवडक बँकांकडून 3,000 रुपयांपर्यंतची बँक ऑफर उपलब्ध आहे आणि Realme 15 5G खरेदी करणाऱ्यांना 2,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळते. दोन्ही हँडसेट सिल्व्हर आणि ग्रीन रंगात उपलब्ध आहेत. व्हॅनिला व्हेरिअंट सिल्क पिंक पर्यायात देखील उपलब्ध आहे, तर प्रो मॉडेल सिल्क पर्पल शेडमध्ये उपलब्ध आहे.
Vicky Kaushal just brought the real party to your palms 🎉
Presenting the all-new #realme15Pro5G & #realme155G. The ultimate #AIPartyPhone duo.
From crisp clarity to lasting battery and one-of-a-kind AI smarts. These are built to shoot, style, and slay your every party moment.… pic.twitter.com/cx6g79KesY
— realme (@realmeIndia) July 24, 2025
Realme 15 5G आणि 15 Pro 5G मध्ये 6.8-इंच 1.5K (2,800×1,280 पिक्सेल्स) AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 2,500Hz इंस्टेंट टच सँपलिंग रेट, 6,500 निट्सपर्यंत लोकल पीक ब्राइटनेस आणि Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन आहे.
Realme 15 5G मध्ये MediaTek Dimensity 7300+ चिपसेट आहे. तर Realme 15 Pro 5G मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसर देण्यात आला आहे. हे फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करतात. ते अँड्रॉइड 15-आधारित Realme UI 6 वर चालतात.
फोटोग्राफीसाठी Realme 15 Pro 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX896 प्रायमरी सेंसर आणि 50-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड शूटर आहे. तर Realme 15 5G मध्ये 50-मेगापिक्सेल Sony IMX882 मेन सेंसर आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अँगल लेंससह डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. दोन्ही हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
Realme 15 5G आणि 15 Pro 5G मध्ये AI-बॅक्ड एडिटिंग फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामध्ये AI Edit Genie आणि AI Party यांचा समावेश आहे. पहिला वॉइस-इनेबल्ड फोटो एडिटिंगला सपोर्ट करतो. तर दुसरा रियल-टाइममध्ये शटर स्पीड, कॉन्ट्रास्ट आणि सॅचुरेशन सारख्या सेटिंग्स ऑटोमॅटिकली अॅडजस्ट करतो. यामध्ये AI MagicGlow 2.0, AI Landscape, AI Glare Remover, AI Motion Control, आणि AI Snap Mode सारखे फीचर्स आहेत. फोन्स GT Boost 3.0 टेक्नोलॉजी आणि Gaming Coach 2.0 ला सपोर्ट करतात, ज्यामुळे गेमिंग एक्सपीरियंस अधिक चांगला होतो.
Realme 15 Pro 5G आणि Realme 15 5G मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट्स IP66+IP68+IP69 डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंस रेटिंग्ससह लाँच करण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर्स देण्यात आले आहेत. फोन 5G, 4G, Wi-Fi, Bluetooth 5.4, GPS, आणि USB Type-C कनेक्टिविटीला सपोर्ट करतात.