Vivo Y Series: कूल कॅमेरा डिझाईन आणि तगडी बॅटरी... असे आहेत Vivo च्या नव्या स्मार्टफोनचे हटके फीचर्स! 30 हजारांहून कमी आहे किंमत
टेक कंपनी Vivo ने त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच केले आहेत. हे स्मार्टफोन Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेले हे दोन्ही स्मार्टफोन Y सीरीजचा भाग आहेत. या दोन्ही डिव्हाईसचे डिझाईन जवळजवळ सारखेच आहे आणि त्यांची वैशिष्ट्ये देखील सारखीच आहेत परंतु एकमेव मोठा फरक मेमरीचा आहे. दोन्ही स्मार्टफोन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.
Y50m 5G मध्ये 6GB रॅम देण्यात आले आहे तर Vivo Y50 5G मध्ये 4GB रॅम ऑफर केले जात आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर हे स्मार्टफोन 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y50m 5G स्मार्टफोन कंपनीने 3 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत चीनमध्ये CNY 1,499 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे.
Vivo Y50 5G स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,199 म्हणजेच सुमारे 13,000 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,499 म्हणजेच सुमारे 18,000 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 1,999 म्हणजेच सुमारे 23,000 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 26,000 रुपये आहे.
Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G या दोन्ही डिव्हाईसमध्ये OriginOS 5 देण्यात आला आहे आणि यामध्ये 6.74-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये 1,000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. डिव्हासईमध्ये पावरफुल ऑक्टा-कोर 6nm मीडियाटेक 6300 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याच्यासोबतच 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देखील उपलब्ध आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी Vivo Y50m 5G आणि Vivo Y50 5G मध्ये f/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सेलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.4, GPS, Beidou, GLONASS, Galileo, QZSS, 3.5mm ऑडियो जॅक, OTG, वाई-फाई आणि USB टाइप-C पोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय, या दोन्ही डिव्हाईसमध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh ची मोठी बॅटरी देखील मिळत आहे, ज्यासाठी कंपनीने दावा केला आहे की ते एका चार्जवर 52 तासांपर्यंतचा टॉकटाइम देऊ शकते.