
Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर
Realme 16 Pro स्मार्टफोन 31,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. तर या डिव्हाईसच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे. OnePlus Nord 5 च्याा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Realme 16 Pro चे डिझाईन अतिशय आकर्षक आहे. याचे डिझाईन’ जापानी डिजाइनर नाओतो फुकासावा यांच्या सहयोगाने तयार करण्यात आले आहे. फ्लॅट बॉडी, पातळ बेजल आणि यूनिक कॅमेरा मॉड्यूल यामुळे फोनला प्रिमियम लूक मिळतो. हा स्मार्टफोन मास्टर गोल्ड, पेबल ग्रे आणि ऑर्किड पर्पल रंगांमध्ये उपलब्ध आहे. Realme 16 Pro ला IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंग मिळाली आहे. OnePlus Nord 5 चे डिझाईन अतिशय साझे आणि स्लीक आहे. वर्टिकल कॅमेरा मॉड्यूल आणि व्यवस्थित आणि स्वच्छ फिनिश यामुळे प्रिमियम अनुभव मिळतो. ड्यूरेबिलिटीसाठी यामध्ये IP65 रेटिंग मिळाली आहे.
Realme 16 Pro मध्ये 6.78-इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रेजोल्यूशन 1272 × 2772 पिक्सेल आहे. यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 6,500 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. OnePlus Nord 5 मध्ये थोडा मोठा 6.8-इंच AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 1280 × 2800 पिक्सेल आहे आणि यामध्ये देखील 144Hz रिफ्रेश रेट दिला आहे. दैनंदिन वापरात, दोन्ही डिस्प्ले जवळजवळ सारखाच अनुभव देतात आणि येथे कोणताही मोठा फरक जाणवत नाही.
Realme 16 Pro मध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 7300 Max 5G चिपसेट दिला आहे. रोजच्या वापरासाठी हा फोन अतिशय स्मूद आहे. गेमिंग दरम्यान फोन गरम होऊ शकतो. OnePlus Nord 5 मध्ये स्नॅपड्रॅगन 8s Gen 3 प्रोसेसर दिला आहे, जो LPDDR5X रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह येतो. हा फोन गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी एक चांगला पर्याय मानला जातो.
Realme 16 Pro मध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे. लो-लाइट फोटोग्राफी देखील अतिशय उत्तम आहे. OnePlus Nord 5 मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP का अल्ट्रा-वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यामध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे. पोर्ट्रेट मोडमध्ये स्किन टोन आणि कलर साइंस जास्त नैसर्गिक वाटते.
Realme 16 Pro मध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus Nord 5 मध्ये 6,800mAh बॅटरी दिली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.