OTT पाहणं आता महागणार! JioHotstar ने वाढवल्या सब्सक्रिप्शन प्लॅन्सच्या किंमती, दरमहिना मोजावे लागणार इतके पैसे
आता नवीन यूजर्ससाठी हॉलीवुड कंटेंट केवळ ‘सुपर’ आणि ‘प्रीमियम’ प्लॅन्समध्ये उपलब्ध असणार आहेत. मोबाईल यूजर्सना जर हॉलीवूड चित्रपट पाहायचे असतील तर त्यांना एक वेगळा ‘अॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅन केवळ एकाच डिव्हाईससाठी उपलब्ध आहे. या प्लॅनची मंथली किंमत 79 रुपये आहे. तर या प्लॅनची क्वार्टरली किंमत 149 रुपये आणि हा प्लॅन वर्षभरासाठी खरेदी करायचा असेल तर 499 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या सब्सक्रिप्शनमध्ये 720p HD रेजोल्यूशन सपोर्ट मिळणार आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिओ हॉटस्टार मोबाईल प्लॅनमध्ये यूजर्सना हॉलीवुड कंटेंटसाठी एक वेगळा ‘अॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार आहे. ज्याची मंथली किंमत 49 रुपये, क्वार्टरलीसाठी 129 रुपये आणि वर्षभरासाठी 399 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
जिओ हॉटस्टार सुपर सब्सक्रिप्शनमध्ये दोन डिव्हाईस सपोर्ट मिळणार आहे. या प्लॅनमध्ये 1080p फुल HD कंटेंट पाहायला मिळणार आहे. जर तुम्ही टिव्हीसाठी जिओ हॉटस्टार सब्सक्रिप्शन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सर्वात परवडणारा प्लॅन आहे. या प्लॅनची मंथली किंंमत 149 रुपये आहे. याशिवाय या प्लॅनची क्वार्टरली किंंमत 349 रुपये आहे. वर्षभरासाठी हा प्लॅन खरेदी करायचा असेल तर 1099 रुपये खर्च करावे लागणार आहेत. या प्लॅनमध्ये हॉलीवुड कंटेंटसाठी ‘अॅड-ऑन’ पॅक खरेदी करावा लागणार नाही.
जिओ हॉटस्टार प्रीमियम सब्सक्रिप्शनमध्ये यूजर्सना 4 डिव्हाईस कनेक्ट करता येणार आहेत. यासोबतच यूजर्स 4K रेजोल्यूशन आणि डॉल्बी व्हिजनमध्ये कंटेट पाहू शकणार आहेत. या प्लॅनची मंथली किंमत 299 रुपये आहे. तर क्वार्टरली या प्लॅनसाठी 699 रुपये आणि वर्षभरासाठी 2199 रुपये खर्च करावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त, प्रीमियम सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर्सना जाहिरात-मुक्त कंटेंट अनुभव मिळणार आहे. तथापि, लाईव्ह स्पोर्ट्स आणि इतर लाईव्ह इव्हेंट्स दरम्यान जाहिराती दिसतील.
Ans: वाढती कंटेंट कॉस्ट, स्पोर्ट्स राइट्स आणि प्रीमियम शोमुळे सब्सक्रिप्शन प्लॅन्स रिवाइज करण्यात आले आहेत.
Ans: नवीन दरांनुसार मंथली प्लॅनसाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात (प्लॅननुसार किंमत वेगळी असते).
Ans: सध्याचा प्लॅन संपल्यानंतर नवे दर लागू होतील. तोपर्यंत जुना प्लॅन वैध राहतो.






