Recharge Plan: Jio पुन्हा घेऊन आलाय ढासू ऑफर! केवळ इतक्या किंमतीत मिळणार 90 दिवसांचे JioHotstar सबस्क्रिप्शन आणि बरंच काही
भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ त्यांच्या युजर्ससाठी पुन्हा एकदा एक नवीन रिचार्ज प्लॅन घेऊन आला आहे. हा रिचार्ज प्लॅन परवडणाऱ्या किंमतीत ऑफर केला जात असून यामध्ये युजर्सना तब्बल 90 दिवसांचं JioHotstar सबस्क्रिप्शन मिळणार आहे. खरं तर हा प्लॅन कंपनीचा आतापर्यंतच्या बेस्ट रिचार्ज प्लॅनपैकी एक आहे. जिओने नुकत्याच लाँच केलेल्या या डेटा प्लॅनबद्दल अधिक जाणून घेऊया.
Realme P3 Ultra: लवकरच भारतात लाँच होणार तगडा स्मार्टफोन, एक्सपेक्टेड फीचर्स आणि किंमत जाणून घ्या
रिलायन्स जिओने त्यांच्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन डेटा रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. याची किंमत केवळ 100 रुपये आहे, तुम्हाला या 100 रुपयांत इंटरनेट डेटासह JioHotstar सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे. या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला कोणतेही अतिरिक्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. 100 रुपयांच्या जिओच्या या डेटा प्लॅनमध्ये युजर्सना तब्बल 90 दिवसांसाठी JioHotstar सबस्क्रिप्शन ऑफर केलं जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
ज्या युजर्सना वेगळे ओटीटी सबस्क्रिप्शन खरेदी न करता मनोरंजनाचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर आहे. JioCinema आणि Disney+ Hotstar च्या विलीनीकरणानंतर JioHotstar अलीकडेच लाँच करण्यात आले आहे. या योजनेद्वारे, जिओ युजर्स एड-सपोर्टेड कंटेंट विनामूल्य पाहू शकतात आणि त्यांना वेगळा मासिक किंवा वार्षिक प्लॅन खरेदी करण्याची देखील आवश्यकता नाही.
रिलायन्स जिओच्या या 100 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह, युजर्सना 90 दिवसांसाठी JioHotstar चे एड-सपोर्टेड कंटेंटचे सबस्क्रिप्शन मिळेल. तथापि, या प्लॅनमध्ये फक्त डेटा बेनिफिट्स आहेत आणि व्हॉइस कॉलिंग किंवा एसएमएसची सुविधा नाही.
जर तुम्हाला JioHotstar चे सब्सक्रिप्शन घ्यायचे असेल, तर त्यासाठी काही प्लॅन देखील उपलब्ध आहेत –
149 रुपये प्रति महिना: यामध्ये 720p रिझोल्यूशनवर फक्त एका मोबाइल डिव्हाइसवर स्ट्रीमिंग करण्याची सुविधा दिली जाते.
299 रुपये प्रति महिना/ 1,499 रुपये प्रति वर्ष: हा JioHotstar प्रीमियम प्लॅन आहे, ज्यामध्ये 300,000 तासांचा कंटेंट, लाईव्ह स्पोर्ट्स, चित्रपट, शो, अॅनिमे आणि डॉक्युमेंट्रीज समाविष्ट आहेत.
जर तुम्हाला फक्त ओटीटी कंटेंट स्ट्रीमिंग आणि काही अतिरिक्त डेटा हवा असेल तर 100 रुपयांचा प्लॅन हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण जर तुम्हाला कॉलिंग आणि जास्त डेटा हवा असेल तर 949 रुपयांचा प्लॅन चांगला असेल. क्रिकेट चाहत्यांसाठी, 195 रुपयांचा क्रिकेट डेटा पॅक देखील योग्य पर्याय असू शकतो. रिलायन्स जिओच्या या परवडणाऱ्या प्लॅनसह, युजर्स आता जास्त पैसे खर्च न करता जिओहॉटस्टारचा आनंद घेऊ शकतात.