Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Samsungच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजकरिता Record pre-orders

Samsung: सॅमसंगच्या 8व्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन Galaxy Z Fold8 Ultra, Galaxy Z Fold8 आणि Galaxy Z Flip8 यांनी भारतात प्री-ऑर्डरचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. 22 जुलै रोजी लॉन्च झाल्यानंतर अवघ्या 72 तासांत या स्मार्टफोन्सना 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Jul 30, 2026 | 06:17 PM
Samsungच्या नवीन गॅलेक्सी झेड (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Samsungच्या नवीन गॅलेक्सी झेड (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Galaxy Z Fold8 Ultra, Fold8 आणि Flip8 ला 72 तासांत 2.71 लाखांहून अधिक प्री-ऑर्डर्स मिळाल्या.
  • 22 जुलै रोजी भारतात लॉन्च झाल्यानंतर प्री-ऑर्डरचा नवा विक्रम
  • गेल्या वर्षीच्या Galaxy Z Fold7 आणि Flip7 पेक्षा यंदा प्री-ऑर्डर्सचा वेग 
  • भारतात फोल्डेबल स्मार्टफोनची लोकप्रियता आणि ग्राहकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात 
Galaxy Z Fold8 Ultra: सॅमसंगचे ८ व्या जनरेशनचे फोल्डेबल स्मार्टफोन्स गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांनी प्री-ऑर्डरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत, ज्यामुळे फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मुख्य प्रवाहात आलेला वापर आणि भारतातील अभूतपूर्व ग्राहक उत्साह अधोरेखित होतो.
भारतात २२ जुलै रोजी लॉंच झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांच्या आत या नवीन डिवाईसेससाठी २,७१,००० हून अधिक प्री-ऑर्डर्सची नोंद झाली. गेल्या वर्षी, सॅमसंग इंडियाला आपल्या गॅलेक्सी झेड फोल्ड७ आणि झेड फ्लिप७ साठी अशीच प्री-ऑर्डर संख्या मिळवण्यासाठी १५ दिवस लागले होते. (Samsung)

उल्लेखनीय यश

गॅलेक्सी झेड फोल्ड८ अल्ट्रा, गॅलेक्सी झेड फोल्ड८ आणि गॅलेक्सी झेड फ्लिप८ यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे, ज्यामध्ये ४५ टक्के प्री-ऑर्डर्स या टियर २ आणि त्यापुढील शहरांमधून आल्या आहेत. यामधून या क्षेत्रांमध्ये फोल्डेबल डिवाईसेसची वाढती मागणी अधोरेखित होते, ज्यामुळे त्यांना व्यापक वाढीची क्षमता असलेले एक नवीन केंद्र म्हणून स्थापित केले गेले आहे.

ही वाढ केवळ फोल्डेबल स्मार्टफोन्सचे व्यापक आकर्षण दर्शवत नाही, तर ग्राहकांचे बदलणारे चित्र देखील दर्शवते, जिथे नाविन्यता आता केवळ महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही.

फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर

या अभूतपूर्व यशाचा विचार करता, सॅमसंगला या वर्षाच्या सुरुवातीला लॉंच केलेल्या एस२६ सिरीजसाठी मिळालेल्या प्री-ऑर्डर्सची बरोबरी करण्याचा आत्मविश्वास आहे, ज्यामधून फोल्डेबल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार झाल्याचे दिसून येते.

वैयक्तिकीकृत गॅलेक्सी एआय अनुभव

“आमच्या नवीन गॅलेक्सी झेड सिरीजला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्पादकता वाढवणाऱ्या आणि सर्जनशील क्षमता सादर करणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी भारतातील वाढती मागणी दर्शवतो. वैयक्तिकीकृत गॅलेक्सी एआय अनुभव देणारी ही डिवाईसेस केवळ मेड इन इंडियाच नाहीत, तर भारतातील ग्राहकांच्या गतिमान गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या आमच्या प्रबळ भारतीय संशोधन आणि विकास क्षमतांद्वारे त्यांना पाठबळ दिले गेले आहे.

टियर २ आणि त्यापुढील शहरांमधून ४५ टक्के प्री-ऑर्डर्स आल्याने, आम्ही महत्त्वपूर्ण क्षमता असलेल्या एका आशादायक वाढत्या बाजारपेठेचा उदय पाहत आहोत,” असे सॅमसंग साऊथवेस्ट एशियाचे प्रेसिडंट आणि सीईओ जेबी पार्क म्हणाले.

Web Title: Record pre orders for samsungs new galaxy z series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • 5G Smartphones
  • Tech News

संबंधित बातम्या

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा
1

Jio आणि T-Mobile ची पार्टनरशिप बदलणार इंटरनेट वापराचा अनुभव, सुरु होणार जगातील पहिली 5G रोमिंग कनेक्टिविटी! असा होणार फायदा

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
2

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
3

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब
4

SEMICON 2026 : भारतात सेमीकंडक्टर क्षेत्रात 10 अब्ज डॉलर्सची बंपर गुंतवणूक; ‘या’ राज्यात उभारणार महाकाय हब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.