Red Magic 11 Pro: गेमर्ससाठी ठरणार वरदान! 8,000mAh बॅटरीसह नव्या स्मार्टफोनची धडाकेबाज एंट्री, स्पेक्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल!
Red Magic 11 Pro सीरीज अखेर लाँच करण्यात आली आहे. Red Magic 11 Pro हा कंपनीचा पहिला असा स्मार्टफोन आहे ज्यामध्ये लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी आणि Snapdragon 8 Elite Gen 5 चिप देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये Nubia चे सब-ब्रँडच्या लेटेस्ट हार्डवेयर ईव्हेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Pro+ मॉडेल तीन कलर आणि चार स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Red Magic 11 Pro ची सुरुवातीची किंमत 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिअंटसाठी CNY 4,999 म्हणजेच सुमारे 62,000 रुपये आणि टॉप व्हेरिअंट 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 70,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन डार्क नाइट आणि सिल्वर वॉर गॉड कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Red Magic 11 Pro+ ची सुरुवातीची किंंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 70,000 रुपये आणि 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 6,499 म्हणजेच सुमारे 80,000 रुपये ठेवण्यात आली आहे. 16GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,999 म्हणजेच सुमारे 86,000 रुपये आणि 24GB+1TB व्हेरिअंटची किंमत CNY 7,699 म्हणजेच सुमारे 95,000 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन कंपनीच्या ऑनलाइन वेबसाइटवर ड्युटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट सिल्व्हर विंग, ड्युटेरियम फ्रंट ट्रान्सपरंट डार्क नाइट आणि डार्क नाइट रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.(फोटो सौजन्य – X)
Red Magic 11 Pro सीरीज Red Magic OS 11 वर आधारित आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.85-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 1.5K रेजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि 95.3% स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आहे. स्क्रीनमध्ये स्टार शील्ड आई प्रोटेक्शन 2.0, मॅजिक टच 3.0 आणि वेट हँड टच सपोर्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहे. यामध्ये X10 ल्यूमिनस मटिरियल आहे, जो 10% कमी पावर कंजप्शन करतो आणि 30% जास्त लाइफ देतो.फोनमध्ये इन-डिस्प्ले 3D अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.
हि सीरीज Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 24GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेज दिलं आहे. यामध्ये Cube Game Engine 3.0 आणि बिल्ट-इन PC गेम एमुलेटर देखील समाविष्ट आहे. फोनमध्ये डुअल विंड आणि वॉटर कूलिंग सिस्टम आहे, जो एयर आणि फ्लोरिनेटेड लिक्विड कूलिंगच्या कॉम्बिनेशनने फोनचे टेम्परेचर कंट्रोल करतो. याचे अॅक्टिव कूलिंग फॅन 4.0 24,000 rpm पर्यंत स्पीडमध्ये फिरतो.
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमरा आहे, ज्यामध्ये 1/1.55-इंच CMOS सेंसर, f/1.88 अपर्चर आणि OIS सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये AI इरेजर, वन-क्लिक फोटो एडिटिंग, AI राइटिंग असिस्टेंस, AI ऑब्जेक्ट रिकॉग्निशन, AI सर्किल टू सर्च आणि AI टॅक्टिकल कोच सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
कंपनीच्या मते, Red Magic 11 Pro सीरीजमधील पंखे IPX8 रेटिंगसह पाणी प्रतिरोधक आहेत. त्यामध्ये 8,000mAh बुल डेमन किंग बॅटरी 3.0 आहे, जी 120W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. याव्यतिरिक्त, त्यात 3.5mm ऑडिओ जॅक, तीन मायक्रोफोन, ड्युअल स्पीकर युनिट्स, 360-डिग्री अँटेना डिझाइन आणि 0815X-अॅक्सिस लिनियर मोटर समाविष्ट आहे.