Honor Magic 8 Launched: Honor ने चीनमध्ये लाँच केले नवीन स्मार्टफोन! इतकी आहे किंमत, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Honor Magic 8 आणि Honor Magic 8 Pro हे दोन स्मार्टफोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा फ्लॅगशिप Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट देण्यात आला आहे, जो 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इनबिल्ट स्टोरेजला सपोर्ट करतात. या स्मार्टफोन्सचे फीचर्स आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.
Honor Magic 8 या स्मार्टफोनचे 12GB + 256GB व्हेरिअंट CNY 4,499 म्हणजेच सुमारे 55,000 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,799 म्हणजेच सुमारे 59,100 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 4,999 म्हणजेच सुमारे 61,600 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 5,499 म्हणजेच सुमारे 67,800 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन वेलवेट ब्लॅक, स्नो व्हाइट, सनराइज गोल्ड आणि एज़्योर ग्लेज कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Honor Magic 8 Pro स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,699 म्हणजेच सुमारे 70,200 रुपये, 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 5,999 म्हणजेच सुमारे 73,900 रुपये, 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 6,199 म्हणजेच सुमारे 76,400 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 6,699 म्हणजेच सुमारे 83,000 रुपये ठेवली आहे.हा स्मार्टफोन वेलवेट ब्लॅक, स्नो व्हाइट, सनराइज गोल्ड सँड आणि एज़्योर ग्लेज कलर्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Honor Magic 8 Pro मध्ये Android 16 बेस्ड MagicOS 10 देण्यात आला आहे. यामध्ये 6.71-इंच 1.5K (1,256×2,808) LTPO OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 6,000nits HDR पीक ब्राइटनेसपर्यंत सपोर्टसह येतो. हे डिव्हाईस Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरवर आधारित आहे, जे 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेजसह येते.
फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, Magic 8 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50MP चा 1/1.3-इंच प्रायमरी सेंसर, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 200MP चा 1/1.4-इंच टेलीफोटो कॅमेरा (f/2.6 अपर्चर, 3.7x ऑप्टिकल झूम आणि 100x डिजिटल झूम) यांचा समावेश आहे. यामध्ये AIMAGE Honor Nox Engine देण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, हे CIPA 5.5 इमेज स्टेबिलाइजेशन ऑफर करते. फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा आणि एक 3D डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. Honor चं म्हणणं आहे की, हा फोन IP68, IP69 आणि IP69K रेटिंग्ससह येतो, ज्याला डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंट आहे.
Moto G100: बजेट किंमतीत मोटोरोलाने लाँच केला तगडा स्मार्टफोन, फीचर्स आणि किंमतीवर नजर टाका
कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 6.0, जीपीएस/एजीपीएस, गॅलिलिओ, ग्लोनास, बीडो, एनएफसी, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आले आहे. यामध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट लाइट सेंसर, कम्पास, IR रिमोट, जाइरोस्कोप, ग्रैविटी सेंसर, कलर टेम्परेचर सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर सारखे अनेक सेंसर देण्यात आले आहेत. यामध्ये अल्ट्रासॉनिक फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे. Honor Magic 8 Pro मध्ये 7,200mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 100W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.
Honor Magic 8 मध्ये तेच SIM स्लॉट, सॉफ्टवेयर, सेल्फी कॅमेरा, IP रेटिंग्स आणि प्रोसेसर देण्यात आले आहेत, जे Magic 8 Pro मध्ये आहेत. यामध्ये 6.58-इंच फुल-HD+ (1,256×2,760 पिक्सेल) डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 6,000nits HDR पीक ब्राइटनेस सपोर्ट आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP चा 1/1.56-इंच मेन सेंसर, 50MP अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 64MP चा सुपर नाइट गॉड टेलीफोटो सेंसर दिला आहे, जो 3x ऑप्टिकल आणि 100x डिजिटल जूम सपोर्ट ऑफर करतो. या डिव्हाईसच्या फ्रंटला 50MP चा वाइड-अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. Honor Magic 8 मध्ये Magic 8 Pro सारखे कनेक्टिविटी आणि सेंसर आहे. यामध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.