Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

108MP कॅमेरा आणि 8GB रॅम… कसा आहे Redmi चा लेटेस्ट Smartphone! किंमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Redmi 13x Launched: गेल्या अनेक दिवसांपासून Redmi च्या ज्या डिव्हाईसची चर्चा होती, ते डिव्हाईस आता अखेर लाँच करण्यात आलं आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत याबद्दल जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2025 | 07:45 PM
108MP कॅमेरा आणि 8GB रॅम... कसा आहे Redmi चा लेटेस्ट Smartphone! किंमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेरा आणि 8GB रॅम... कसा आहे Redmi चा लेटेस्ट Smartphone! किंमतीपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Follow Us:

टेक कंपनी Xiaomi च्या स्मार्टफोन ब्रँड Redmi ने त्यांचा नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारात लाँच केला आहे. व्हिएतनाममध्ये लाँच करण्यात आलेला Redmi 13x स्मार्टफोन बजेट किंमतीत उपलब्ध आहे. नवाकोरा स्मार्टफोन मीडियाटेक प्रोसेसर, 108 मेगापिक्सल डुअल रियर कॅमेरा आणि 8 जीबीपर्यंत रॅमला सपोर्ट करतो. स्मार्टफोनची किंमत 16 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर Redmi ने लाँच केलेला हा स्मार्टफोन तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

14,100 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच झाले Honor ने दोन नवीन ‘स्मार्ट’फोन, असे आहेत स्पेसिफिकेशन्स

गेल्या अनेक दिवसांपासून Redmi 13x बद्दल चर्चा सुरु होती. हा आगामी स्मार्टफोन कसा असणार, त्याचे फीचर्स कसे असणार, त्याची किंमत काय असणार, याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता अखेर त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. कारण सर्वांना प्रतिक्षा असलेला Redmi 13x अखेर लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सध्या जागतिक बाजारात लाँच करण्यात आला आहे. त्याची भारतात एंट्री कधी होणार, भारतात हा स्मार्टफोन कोणत्या नावाने लाँच केला जाणार, त्याची किंमत काय असणार, याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही माहिती दिलेली नाही. मात्र भारतातील युजर्सना Redmi 13x ची प्रतिक्षा आहे. (फोटो सौजन्य – X) 

Redmi 13x ची किंमत काय आहे?

Redmi 13x 4G स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह दोन रॅम पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा 6 जीबी व्हेरिअंटची किंमत VND 4,290,000 म्हणजेच सुमारे 14,300 रुपये आणि 8 जीबी व्हेरिअंटची किंमत VND 4,690,000 म्हणजेच सुमारे 15,590 रुपये आहे.

Redmi 13x चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Redmi 13x स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचे रिझोल्यूशन 1800 × 2400 पिक्सेल आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल सेटअप दिसतो. यासोबतच, डिस्प्लेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाले तर, त्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे आणि कमाल ब्राइटनेस 550nits आहे.

फ्रीमध्ये तुमचं आवडतं Character आणि अनेक नवीन रिवॉर्ड मिळवण्याची संधी, आत्ताच वापरा Free Fire MAX मधील हे Redeem Codes

प्रोसेसर आणि मेमरी

Redmi चा हा नवीनतम फोन मीडियाटेकच्या हेलियो G91 अल्ट्रा ऑक्टा कोर प्रोसेसरसह लाँच करण्यात आला आहे. व्हिएतनाममध्ये लाँच झालेला हा फोन 6GB आणि 8GB रॅम पर्यायांसह आणला गेला आहे. दोन्ही मॉडेल्स 128 जीबी स्टोरेजसह येतात. यासोबतच स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Redmi 13x मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सेलचा आहे, ज्यामध्ये 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर वैशिष्ट्ये

नवीनतम Redmi 13x 4G स्मार्टफोनमध्ये 5030mAh बॅटरी आहे, जी 33W जलद चार्जिंगला सपोर्ट करते. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. याला 3.5 मिमी ऑडिओ चेक, ड्युअल-सिम आणि ब्लूटूथ 5.3 सारख्या वैशिष्ट्यांसह IP53 रेटिंग देण्यात आले आहे.

Web Title: Redmi 13x launched in global market know about price and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch
  • xiaomi update

संबंधित बातम्या

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव
1

50 मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह चीनमध्ये नवा iQOO 16 लाँच! प्रिमियम फीचर्स आणि आकर्षक डिझाईनसह बदलणार यूजर्सचा अनुभव

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर
2

Nothing Phone (4a) आणि Phone (4b) च्या नव्या व्हेरिअंट्सची भारतात एंट्री! 6GB रॅम अन् असे आहेत फीचर्स… जाणून घ्या सविस्तर

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
3

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत
4

प्रतिक्षा संपली! तगड्या फीचर्ससह नव्या Oppo Reno स्मार्टफोनची चीनमध्ये धमाकेदार एंट्री, इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.