4G कनेक्टिविटी आणि 5200mAh बॅटरीसह Redmi चा नवा Smartphone लाँच, किंमत केवळ इतकी; जाणून घ्या फीचर्स
टेक कंपनी Xiaomi च्या स्मार्टफोन ब्रँड Redmi ने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा बजेट स्मार्टफोन भारतात Redmi A5 या नावाने लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन 4G कनेक्टिव्हिटीसह येतो, त्यात 120Hz च्या रिफ्रेश रेटसह 6.88-इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 10 हजार रुपयांहून कमी आहे. पहिल्या सेलमध्ये या स्मार्टफोनच्या खेरदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या व्हेरिअंटची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स सविस्तरपणे जाणून घेऊया.
Redmi A5 4G स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 3GB रॅम+64GB स्टोरेज आणि 4GB रॅम+128GB स्टोरेज यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 3GB रॅम+64GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 8999 रुपये आहे, पण हा फोन पहिल्या सेलमध्ये 6499 रुपयांना खरेदी करता येईल. (फोटो सौजन्य – X)
4GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 9999 रुपये आहे. पण हा स्मार्टफोन पहिल्या सेलमध्ये 7499 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनचा पहिला सेल आज 16 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरू होईल. त्यामुळे तुम्हाला हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी अगदी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पहिली विक्री सुरु होताच तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करून मोठी बचत करू शकता.
11/
Redmi A5 has launched in India.
– 6.88 inch 120HZ HD+ 600 nits Display
– Unisoc T7250 Processor
– 3GB/64GB & 4GB/128GB Variants
– Side mounted fingerprint sensor
– IP52 protection
– Bottom Firing Speaker
– 5200mAh Battery 15W Charging
– 3GB/64GB at ₹6499
– 4GB/128GB at… pic.twitter.com/aEONMM5uCi— Mukul Sharma (@stufflistings) April 15, 2025
Redmi A5 4G स्मार्टफोनमध्ये 6.88-इंच (1640 x 720 पिक्सेल) एचडी+ आयपीएस एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येते. ते TÜV राईनलँड-प्रमाणित आहे.
या फोनमध्ये 1.8 GHz ऑक्टा-कोर UNISOC T7250 12nm प्रोसेसर आहे, ज्यामध्ये ग्राफिक्स सपोर्टसाठी Mali-G57 MP1 GPU आहे.
हा फोन 3 जीबी आणि 4 जीबी रॅमसह 64 जीबी आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यासोबतच स्टोरेजसाठी फोनमध्ये मायक्रोएसडी कार्ड देखील देण्यात आले आहे.
रेडमीने लाँच केलेल्या या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे, ज्याचा अपर्चर f/2.0 आहे. यासोबतच सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या रेडमी फोनमध्ये 5200mAh बॅटरी आहे, जी 15W चार्जिंगला सपोर्ट करते. यासोबतच फोनमध्ये USB टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.
कनेक्टिव्हिटीसाठी, या रेडमी फोनमध्ये ड्युअल 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac 2.4GHz/5GHz, ब्लूटूथ 5.2, GPS आणि GLONASS आहे ज्यामध्ये गॅलिलिओ आणि BDS आहेत.