Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: हातात स्मार्टवॉच, पण तरीही लागतेय फोनची गरज? डिव्हाईस खरंच कामाचं की फक्त फॅशनपुरतंच? खरेदीपूर्वीच वाचा

बस, ट्रेन, रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तिच्या हातात तुम्हाला स्मार्टवॉच पाहायला मिळत. अनेकांचं म्हणणं असतं की, स्मार्टवॉच आरोग्याची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरतं. पण खरंच असं आहे का? खरेदीपूर्वी सत्य वाचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 25, 2026 | 10:49 AM
Tech Tips: हातात स्मार्टवॉच, पण तरीही लागतेय फोनची गरज? डिव्हाईस खरंच कामाचं की फक्त फॅशनपुरतंच? खरेदीपूर्वीच वाचा

Tech Tips: हातात स्मार्टवॉच, पण तरीही लागतेय फोनची गरज? डिव्हाईस खरंच कामाचं की फक्त फॅशनपुरतंच? खरेदीपूर्वीच वाचा

Follow Us
Follow Us:
  • स्मार्टवॉच अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून
  • AI टूल्समुळे सर्व कामं फोनमध्ये करणं आणखी सोपं झालं आहे
  • स्मार्टवॉचचे फीचर्स 100 टक्के परफेक्ट नसतात
आजच्या काळात छोट्या मुलांपासून अगदी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या वयोवृद्ध लोकांपर्यंत, सर्वांच्या हातात स्मार्टवॉच पाहायला मिळतात. फिटनेस ट्रॅकिंगपासून कॅमेरा कंट्रोलपर्यंत स्मार्टवॉच्या मदतीने अनेक कामं करणं अगदी सहज शक्य होतं. स्मार्टवॉच लाँच करणाऱ्या अनेक कंपन्या देखील असा दावा करतात की, स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनद्वारे केली जाणारी अनेक कामं पूर्ण करू शकता. मात्र खरंच असं आहे का? स्मार्टवॉच अनेक कामांसाठी स्मार्टफोनवर अवलंबून असते. त्यामुळे स्मार्टवॉच आणि स्मार्टफोन अशा दोन्ही गॅझेट्सचा वापर करताना यूजर्सना वैताग येतो. अशाच काही कारणांबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Free Fire Max: खुशखबर! प्लेअर्सना मिळणार प्रीमियम वेपन स्किन क्लेम करण्याची संधी… अशी आहे प्रोसेस

असे अनेक लोकं आहेत ज्यांना वाटते की, स्मार्टवॉच खरेदी करणं फायद्याचा व्यवहार नाही. कारण स्मार्टवॉचचा वापर करताना अनेकदा आपल्याला आपला फोन देखील खिशातून बाहेर काढावा लागतो. अशाच काही कारणांमुळे खरंच स्मार्टवॉच खरेदी करावे की नाही असा प्रश्न यूजर्सच्या मनात कायम असतो.  (फोटो सौजन्य – Pinterest)

फोनची गरज कमी झाली नाही

स्मार्टवॉच लाँच करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजेच नोटिफेकशन आणि मेसेज पाहण्यासाठी तसेच कॉल रिसीव्ह करण्यासाठी स्मार्टफोन वारंवार खिशातून काढावा लागू नये. नोटिफेकशन, मेसेज आणि कॉल मॅनेजमेंट स्मार्टवॉचद्वारे केले जाऊ शकेल. मात्र जेव्हा पासून AI टूल्स लाँच झाले आहेत, ही सर्व कामं फोनमध्ये करणं आणखी सोपं झालं आहे. आता तुमचा फोन सर्व नोटिफेशन्सचा हिशोब ठेवतो आणि कमांड देऊन तुम्ही आलेला मेसेज देखील वाचू शकता. याशिवाय, मेसेजचा रिप्लाय देण्यासाठी किंवा कॉल रिसीव्ह करण्यासाठी स्मार्टफोन स्मार्टवॉचपेक्षा जास्त फायद्याचा ठरतो.

फीचर्स 100 टक्के परफेक्ट नाही

स्मार्टवॉचमध्ये तुम्हाला हार्ट रेट, ब्लड ऑक्सीजन लेवल, स्लीप पॅटर्न आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग सारखे इत्यादी फीचर्स मिळणार आहेत. तसं तर हे फीचर्स जास्त आकर्षक आणि मजेदार वाटतात. मात्र हे फीचर्स 100 टक्के परफेक्ट नसतात. वेगवेगळ्या रिव्यूजमधून असे दिसून आले आहे की प्रत्येक मॉडेल वेगवेगळे रीडिंग देते. कंपन्यांना देखील याबाबत माहिती आहे. त्यामुळे स्मार्टवॉच म्हणजे मेडिकल डिव्हाईस असल्याचा दावा कंपन्यांकडून केला जात नाही. कंपन्या स्मार्टवॉच जनरल इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस स्वरुपात बाजारात लाँच करते.

बॅटरी आणि चार्जिंगची झंझट

आजकाल स्मार्टफोन, लॅपटॉप, ईयरबड्ससह सर्व डिव्हाईस वापरण्यासाठी चार्जिंगचा वापर करावा लागतो. या डिव्हाईसमध्ये स्मार्टवॉचचा देखील समावेश आहे. म्हणून, जर तुम्ही बाहेर जात असाल तर तुमच्या स्मार्टवॉचमध्ये किती बॅटरी शिल्लक आहे ते तपासावे लागेल. जर बॅटरी कमी असेल तर ती चार्ज करण्याचा अतिरिक्त ताण येतो.

WhatsApp Update: आता रिमाइंडरची गरज नाही! मीटिंग, वाढदिवस, शुभेच्छा… ठराविक वेळी अ‍ॅप आपोआप पाठवेल तुमचा मेसेज

स्मार्टवॉचच्या किंमती प्रचंड असतात

काही स्मार्टवॉच हजारो रुपयांच्या किंमतीत लाँच केले जातात, जे सर्वसामान्यांना खरेदी करणं फार कठीण असते. जर आपण सॅमसंग, गुगल आणि अ‍ॅपल सारख्या कंपन्यांच्या स्मार्टवॉचच्या किंमती पाहिल्या तर या किंमतीत मिड-रेंज सेगमेंटमधील स्मार्टफोन खरेदी केला जाऊ शकतो.

Web Title: Buying smartwatch is really useful or just for trend know everything about smartwatch before buy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • smartphone
  • smartwatch
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स
1

IMC 2026 मध्ये Motorola Signature 27 ची झलक सादर! 200MP कॅमेरा अन् मिळणार 7 वर्षांचे अपडेट्स… वाचा डिटेल्स

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर
2

Flipkart Sale 2026: अबब! थेट 9 हजार रुपयांची सूट… Vivo च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार खास ऑफर्स अन् बँक डिस्काऊंट, वाचा सविस्तर

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय
3

Tech Tips: महागडा iPhone हँग झाला अन् तुमचाही पारा चढला? फोन फ्रीज होण्याची ‘ही’ असू शकतात कारणं, घरबसल्या करा ‘हे’ उपाय

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
4

10,200mAh बॅटरीसह Vivo चा नवा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! 120Hz डिस्प्ले अन् 90W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.