अबब! तब्बल 12000 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा Samsung चा हा Smartphone, ईएमआय केवळ 3278 रुपये
स्मार्टफोन कंपनी सॅमसंगने त्यांच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर सुरु केली आहे. या ऑफरमध्ये कंपनीतर्फे त्यांच्या प्रिमियम स्मार्टफोनवर तब्बल 12 हजार रुपयांचं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत खरेदी करू शकता. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असाल किंवा तुमचा जुना स्मार्टफोन अपग्रेड करायचा असेल तर ही ऑफर तुमच्यासाठी बेस्ट आहे. ज्यांना सॅमसंगचा प्रिमियम स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण बजेट कमी आहे, अशा लोकांसाठी सॅमसंगची ही ऑफर बेस्ट आहे.
सॅमसंगने त्यांच्या प्रीमियम स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Ultra वर एक उत्तम ऑफर सुरु केली आहे. आता हा स्मार्टफोन खरेदी करणे आणखी सोपे झाले आहे आणि या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांची बचत देखील होईल. Galaxy S25 Ultra खरेदी केल्यावर, तुम्हाला 12000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक मिळेल. ही डील या फोनच्या टायटॅनियम सिल्व्हरब्लू कलर व्हेरिअंटवर दिली जात आहे. इतकेच नाही तर तुम्ही हा फोन 3278 रुपयांच्या सुरुवातीच्या नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Samsung Galaxy S25 Ultra वरील ही ऑफर 30 एप्रिलपर्यंत लाइव्ह असेल. 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या फोनच्या व्हेरिअंटची किंमत 1,29,999 रुपये आहे. 12000 रुपयांच्या कॅशबॅकनंतर, फोनची किंमत 1,17,999 रुपये होईल. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे हा स्मार्टफोन अधिक पावरफुल बनतो.
Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 6.9-इंचाचा Quad HD+ Dynamic AMOLED 2X डिस्प्ले आहे, जो 120Hz अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटसह येतो. या डिव्हाइसला टायटॅनियम बॉडी आणि Corning Gorilla Armor 2 संरक्षण मिळते. कंपनीने Galaxy AI पूर्णपणे एकात्मिक केले आहे, जे One UI 7 सोबत येते. यात 7 वर्षांपर्यंत ओएस आणि सुरक्षा अपडेट्स मिळतील. या फोनमध्ये नाऊ ब्रीफ आणि नाऊ बार सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी दिवसभरातील यूजरच्या वर्तनावर आधारित सजेशन आणि एक्टिविटी ट्रॅकिंग प्रदान करतात.
कामगिरीसाठी, या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन 12GB रॅम आणि 1TB पर्यंतच्या अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. फोटोग्राफी आणि व्हिडिओसाठी, हा फोन 200MP + 50MP + 10MP + 50MP क्वाड-कॅमेरा सेटअपसह येतो जो एक उत्तम फोटोग्राफी अनुभव देतो. सेल्फी प्रेमींसाठी, यात 12MP फ्रंट कॅमेरा आहे. फोनला पॉवर देण्यासाठी, त्यात 5000mAh बॅटरी आहे. ओएसबद्दल बोलायचे झाले तर, हा फोन OneUI 7 वर काम करतो.