गेमर्सची मज्जाच मजा! अनोख्या फीचर्ससह Redmi चा नवा स्मार्टफोन लाँच, Shield Glass प्रोटेक्शनसह मिळणार 100W चार्जिंग सपोर्ट
चीनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Redmi च्या ईव्हेंटमध्ये गेमर्ससाठी नवीन स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Redmi K80 Ultra या नावाने कंपनीने लाँच केला आहे. हा स्मार्टफोन विशेष करून गेमर्ससाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामध्ये MediaTek Dimensity 9400+ प्रोसेसर देण्यात आला आहे. शिवाय या डिव्हाईसमध्ये अनोखे फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे गेमर्सचा अनुभव अत्यंत चांगला व्हावा. स्मार्टफोनमध्ये डस्ट आणि वॉटर रेजिस्टेंससाठी IP68 रेटिंग देण्यात आलं आहे. स्मार्टफोन प्रिमियम रेंजमध्ये लाँच करण्यात आला आहे.
Redmi K80 Ultra च्या बेस मॉडेल 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,599 म्हणजेच सुमारे 31,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर या स्मार्टफोनच्या 12GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 35,800 रुपये, 16GB + 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,799 म्हणजेच सुमारे 33,400 रुपये आणि 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,299 म्हणजेच सुमारे 39,400 रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेल 16GB रॅम+ 1TB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,799 म्हणजेच सुमारे 45,400 रुपये आहे. Redmi K80 Ultra आइस ब्लू, मून रॉक व्हाइट, सँडस्टोन ऐश, आणि स्प्रूस ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Redmi K80 Ultra डुअल-सिम (नॅनो+नॅनो) हँडसेट आहे. या डिव्हाईसमध्ये 6.83-इंच 1.5K (1,280×2,772 पिक्सेल) OLED स्क्रीन देण्यात आली आहे. ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 2,560Hz पल्स-विड्थ मॉड्यूलेशन (PWM) डिमिंग, 480Hz टच सँपलिंग रेट आणि कंपनीचे इन-हाउस Xiaomi Shield Glass प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे.
या डिव्हाईसमध्ये 3nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9400+ चिपसेट आहे. ज्याला 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. हँडसेट IP68 रेटिंगसह येणार आहे आणि Android 15 बेस्ड HyperOS 2 स्किनवर आधारित आहे.
Redmi K80 Ultra मध्ये 50-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. फ्रंटला, हँडसेटमध्ये 20-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. जो सेंटर-अलाइन्ड होल-पंच डिस्प्ले कटआउटमध्ये आहे.
Redmi K80 Ultra च्या कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Auracast, GPS, A-GPS, NavIC, NFC, आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे.
या डिव्हाईसमध्ये 7410mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 100W ला सपोर्ट करू शकते. फोनमध्ये बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.