Elon Musk Birthday: अब्जावधी डॉलर्सच्या मालकाची कहाणी! अशी केली होती करिअरची सुरुवात... ती एक चूक पडली महागात
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि स्पेसएक्सचा मालक, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचा सिईओ एलन मस्कचा आज 28 जून रोजी वाढदिवस आहे. इनोव्हेटिव्ह आणि बोल्ड बिलेनियर एलन मस्क 54 वर्षांचा झाला आहे. जगभरात क्वचितच असा एखादा व्यक्ती पाहायला मिळेल ज्याला मस्कबद्दल माहिती नाही. सोशल मीडियापासून सॅटेलाईट इंटरेनटपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मस्कने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
Jio आणि Airtel यूजर्स… Panchayat Season 4 फ्रीमध्ये बघायचाय? हा जुगाड तुमच्यासाठी आहे बेस्ट
एलन मस्कचे त्याच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील सतत काही ना काही बदल करत असतो. ज्यामुळे युजर्सना चांगला अनुभव मिळावा. याशिवाय मस्क सॅटेलाईट इंटरनेट सेवा देखील सुरु करत आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना देखील इंटरनेटचा वापर करता यावा. मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे. पण या व्यक्तीने त्याच्या करिअरची सुरुवात कशी केली, हा यशाचा टप्पा कसा गाठला याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
मस्क टेस्लापासून स्पेसएक्स, Neuralink, xAI आणि X (Twitter) सारख्या मल्टीबिलियन डॉलर प्रोजेक्ट्सवर काम करतो. हे केवळ टॅलेंट नाही तर टाइम इंजीनियरिंग आहे. सामान्य माणसांप्रमाणेच मस्ककडे देखील 24 तासच आहेत. पण तो त्याच्या वेळेचा पुरेपुर उपयोग करून मल्टीबिलियन डॉलर प्रोजेक्ट्सवर काम करतो. काही अहवाल आणि मुलाखतींनुसार, एलोन मस्क सकाळी ७ वाजता उठतो. तो फक्त 5 ते 6 तास झोपतो. सध्या मस्कची संपती सुमारे 366 अब्ज डॉलर आहे. मात्र हा टप्पा गाठण्यासाठी मस्कला प्रचंड मेहनत करावी लागली आहे. मस्क सुरुवातीला अत्यंत गरिबीत जगला आहे. झोपण्यासाठी वेगळी खोली खरेदी करावी लागू नये आणि पैसे वाचावे म्हणून मस्क ऑफीसमध्ये झोपायचा. याशिवाय अंघोळीसाठी आणि इंटरनेट वापरासाठी देखील मस्कने वेगळा जुगाड केला होता.
रिपोर्टनुसार, एलन मस्कची पहिली कंपनी Zip2 होती. ही गोष्ट 1990 च्या दशकातील आहे. स्टॅनफोर्ड यूनिवर्सिटीमधून पीएचडी करून मस्क त्याच्या कंपनी Zip2 मध्ये जात होता. ही कंपनी सॉफ्टवेयर तयार करत होती. त्याचे सुरुवातीचे दिवस अत्यंत हालाखीचे होते. Zip2 चे ऑपरेशन यशस्वी झाले आणि कंपनीची भरभराट झाली. पण मस्कने केलेली एक चूक त्याला महागात पडली.
हे आहेत Jio चे 5 ढासू रिचार्ज प्लॅन्स, Unlimited सुविधा आणि किंमत 300 रुपयांहून कमी
रिपोर्टनुसार, मस्कने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं की त्याची सर्वात मोठी चूक म्हणजे गुंतवणूकदारांना जास्त नियंत्रण देऊ देणे. गुंतवणूकदारांच्या अतिरेकी हस्तक्षेपामुळे मस्कला त्यांची पहिली कंपनी गमवावी लागली. त्यानी ती कंपनी 300 मिलियन डॉलरला विकली. तो म्हणाला की मी इंटरनेट न समजणाऱ्या लोकांना खूप स्वातंत्र्य दिले. अहवालानुसार, 90 च्या दशकात जेव्हा मस्क त्याची कंपनी चालवत होता, तेव्हा इंटरनेट खूपच मर्यादित होते. त्याने ऑफिसच्या खाली असलेल्या आयएसपी म्हणजेच इंटरनेट सेवा प्रदात्याशी संपर्क साधण्यासाठी ऑफिसच्या मजल्यामध्ये एक छिद्र केले होते.