Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 18 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Redmi K90 Max Launched: रेडमीने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन दमदार फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत सुमारे 41,000 रुपये आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 24, 2026 | 11:49 AM
अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

अखेर तो दिवस आलाच! अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅनसह Redmi स्मार्टफोन लाँच, मोठी बॅटरी आणि पावरफुल फीचर्सने सुसज्ज

Follow Us
Follow Us:
  • रेडमी के 90 मॅक्समध्ये 165Hz रिफ्रेश रेटसह 1.5K डिस्प्ले आणि 3500 निट्स ब्राइटनेस देण्यात आला आहे, ज्यामुळे व्हिज्युअल अनुभव जबरदस्त मिळतो.
  • मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 प्रोसेसर, 16GB रॅम आणि अ‍ॅक्टिव कूलिंग सिस्टिममुळे हा फोन हाय-एंड गेमिंग आणि मल्टिटास्किंगसाठी सक्षम आहे.
  • 8,550mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि IP66+IP68+IP69 रेटिंगमुळे हा स्मार्टफोन परफॉर्मन्ससोबत टिकाऊपणाही देतो.
Redmi Smartphone Launched: टेक कंपनी रेडमीने चीनमध्ये कंपनीच्या K सीरीजमधील एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा नवीन स्मार्टफोन Redmi K90 Max या नावाने सादर करण्यात आला आहे. नवा स्मार्टफोन रेडमी के 90 प्रो मॅक्स आणि स्टँडर्ड रेडमी के 90 लाईनअपमध्ये समाविष्ट झाला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन मिड रेंज किंमतीत सादर केला आहे. रेडमी के 90 मॅक्सची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

परफेक्ट फोटो अन् प्रीमियम अनुभव! 200MP कॅमेऱ्यासह नव्या Oppo स्मार्टफोनची एंट्री, फोटोग्राफी होणार प्रो लेव्हल

रेडमी के 90 मॅक्स ची किंमत आणि उपलब्धता

रेडमी के 90 मॅक्स स्मार्टफोन 12GB+256GB, 12GB + 512GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB या व्हेरिअंटमध्ये सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये, 12GB + 512GB आणि 16GB + 256GB या व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 47,000 रुपये ठेवली आहे. 16GB + 512GB व्हेरिअंटची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 54,000 रुपये आणि 16GB + 1TB व्हेरिअंटची किंमत CNY 4,699 म्हणजेच सुमारे 64,000 रुपये ठेवली आहे. कंपनीचा नवीन स्मार्टफोन स्पेस सिल्वर, शॅडो ब्लॅक आणि स्का ब्लू (चीनी भाषेतून अनुवादित) रंगात लाँच करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – X)

Redmi K90 Max launched in China.
Price 💰 ¥2,999 (~₹41,131, $439, €373)
Specifications:
📱 6.83-inch 1.5K TCL M10 flat LTPS display, 165Hz refresh rate, 2000nits HBM, Xiaomi Dragon Crystal Glass for protection
◼️ MediaTek Dimensity 9500 SoC, Graphics Chip D2, T1+ signal chip… pic.twitter.com/BovJIALAPM
— Abhishek Yadav (@yabhishekhd) April 21, 2026

रेडमी के 90 मॅक्स चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डुअल सिम असलेला वाला रेडमी के 90 मॅक्स अँड्रॉईड 16 वर बेस्ड हायपरओएस 3 वर चालते. या स्मार्टफोनमध्ये 6.83-इंच 1.5K (1,280×2,772 पिक्सेल) M10 डिस्प्ले दिला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 165Hz पर्यंत, टच सँपलिंग रेट 480Hz आणि पीक ब्राइटनेस 3500 निट्सपर्यंत आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 3500Hz टाइंस्टेंटेनियस टच सँपलिंग रेट आणि 480Hz चा मल्टी-फिंगर टच सँपलिंग रेट देखील आहे. याचा डिस्प्ले HDR10+ आणि डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो.

रेडमीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 9500 चिपसेट दिला आहे. ज्यामध्ये 16GB पर्यंत एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 1TB पर्यंत यूएफएस 4 स्टोरेज दिले आहे. गेमिंगसाठी .या स्मार्टफोनमध्ये एक डेडिकेटेड D2 डिस्प्ले चिपचा वापर करण्यात आला आहे. थर्मल मॅनेजमेंटसाठी, या हँडसेटमध्ये 6000 चौरस मिमीचा आईस-सील्ड सर्क्युलेटिंग कूलिंग पंप आणि 12,000 चौरस मिमी पेक्षा जास्त ग्राफाइट एरिया आहे. या नव्या हँडसेटमध्ये एक अ‍ॅक्टिव्ह कूलिंग फॅन देखील देण्यात आला आहे, ज्याबाबत असा दावा केला जात आहे की, तो 100 सेकंदात तापमान अंदाजे 10°C ने कमी करतो.

कॅमेरा आणि फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर, रेडमी के 90 मॅक्समध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये OIS आणि f/1.68 अपर्चरवाला 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 20-मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये 1115x सिमेट्रिकल स्टीरियो डुअल स्पीकर यूनिट दिले आहे, जे बोससोबत को-ट्यूनिंग केलेले आहे.

Motorola Edge 70 Pro लाँच! 50MP ट्रिपल कॅमेरा आणि 6500mAh बॅटरीने सुसज्ज, यूजर्सना मिळणार AI फीचर्ससह फ्लॅगशिप अनुभव

डिव्हाईसमध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 22.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 8,550mAh बॅटरी दिली आहे. तसेच यामध्ये 5जी, वाय-फाय 7, ब्लूटूथ 4, नेविक, जीपीएस/एजीपीएस, गॅलिलिओ, ग्लोनास, बेईडू, एनएफसी, ओटीजी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे कनेक्टिव्हिटी पर्याय देण्यात आले आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी यामध्ये IP66 + IP68 + IP69 रेटिंग दिले आहे. ऑथेंटिकेशनसाठी यामध्ये 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर दिले आहे. या स्मार्टफोनमध्ये एक्सेलेरोमीटर, एम्बिएंट कलर टेम्परेचर सेंसर, इलेक्ट्रॉनिक कंपास, जायरोस्कोप, IR रिमोट कंट्रोल, फ्लिकर सेंसर आणि X-axis लीनियर मोटर सारखे सेंसर देखील दिले आहेत.

Web Title: Redmi k90 max launched power packed performance meets premium gaming features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • Redmi
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित
1

सोशल मीडियापासून दूर राहणं झालं सोपं! या कंपनीने लाँच केला अनोखा ‘डिजिटल डिटॉक्स’ स्मार्टफोन… फीचर्स वाचून व्हाल चकित

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स
2

एंट्री होताच वेधलं लक्ष! पावरफुल बॅटरी आणि मोठ्या डिस्प्लेसह नवा Tecno 4G स्मार्टफोन लाँच, खरेदीपूर्वी जाणून घ्या खास फीचर्स

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत
3

आकर्षक डिझाईनसह नव्या स्मार्टफोनने केली एंट्री… 5100mAh बॅटरी आणि पावरफुल फीचर्स करणार कमाल! जाणून घ्या किंमत

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या
4

प्रतिक्षा संपली! 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह नवा Redmi भारतात लाँच… फीचर्स आणि किंंमत जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.